Lok Adalat : लोकन्यायालयात कौटुंबिक वादाला मूठमाती; रावेरला लोकअदालतीत 64 खटले निकाली

Lok Adalat : वडिलोपार्जित मिळकत वाटणीचा वाद मिटविण्यात रावेर लोकन्यायालयात यश आले.
Lok Adalat
Lok Adalat esakal
Updated on

Jalgaon News : वडिलोपार्जित मिळकत वाटणीचा वाद मिटविण्यात रावेर लोकन्यायालयात यश आले. एकूण ६४ खटले निकाली तर २२ लाख,६७ हजार रुपये वसूल झाले . यात कौटुंबिक मालमत्ता वाटपाचा तिढा सामोपचाराने सोडविण्यात आला.

रावेर तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात झालेल्या लोकन्यायालयात वाघोड (ता. रावेर) येथील मुळ रहिवासी कुटुंबात वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणी वरून वाद प्रलंबित होता. (Jalgaon Raver disposed 64 cases in Lok Adalat)

विधी सेवा समितीचे अध्यक्ष व रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. पी. यादव, वादीचे वकील ॲड. किशोर पाटील व प्रतिवादींचे वकील ॲड. व्ही. पी. महाजन यांच्या पुढाकाराने तडजोड होऊन दिवाणी खटला निकाली काढत वडिलोपार्जित मिळकतीत समान वाटणीतून कुटुंबातील दुफळी मिटविण्यात यश आले.

प्रलंबित असलेले ४१ खटले व दाखल पूर्वी तडजोड २४ खटले असे एकूण ६४ खटले तडजोडीने निकाली निघाली. तसेच विविध बँका, ग्रामपंचायती, बीएस.एन.एल. व एम. एस. ई. बी. यांची थकबाकी २२ लाख,६७ हजार रुपये वसुल करण्यात आले.

न्या. पी. पी. यादव, सरकारी वकील श्रीकृष्ण दुट्टे, वकील संघांचे अध्यक्ष ॲड. बि.डी. निळे, सचिव ॲड. किशोर पाटील, ॲड. व्ही. पी. महाजन, ॲड. विपिन गडे,ॲड. योगेश गजरे, ॲड. प्रमोद विचवे, ॲड.सुभाष धुंदले, ॲड. दीपक गाढे, ॲड. उदय सोनार. (latest marathi news)

Lok Adalat
Jalgaon News : आर्चीने जिंकली प्रेक्षकांची मने

ॲड. अमोल कोंघे, ॲड. नीलेश महाजन,ॲड. सलीम जमलकर,ॲड. सुवर्णा रावेरकर, ॲड. संदेश पाटील, ॲड. दीपक तायडे,पंच सदस्य ॲड. परदेशी, सहाय्यक अधीक्षक बिऱ्हाडे, एल. आर. पाटील, मनोहर शिंपी, खुपसे मॅडम,डी. जि. इंगळे, आर. आर. सोनवणे, डी. एस. डिवरे, भूषण महाजन,ए. के. काळे, भरत बारी, निखिल पाटील, सतीश रावते,भगवान चौधरी, दिनेश साळी आदींनी परिश्रम घेतले.

रावेर - येथील लोकन्यायालयात न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. पी. यादव यांचे समोर कुटुंबाचे तडजोड करताना वकील व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बि.डी. निळे .

Lok Adalat
CM Shinde Jalgaon Daura : पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.