Raver Lok Sabha Constituency : रक्षा खडसेंविरोधात उमेदवार बदलले अन्‌ पक्षही! कॉंग्रेस- राष्ट्रवादी अपयशी

Jalgaon : रावेर लोकसभा मतदारसंघाने सातत्याने भाजपलाच साथ दिल्याचा इतिहास आहे. गेल्या तीन लढतींचे चित्र पाहता, २००९ पासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी भाजपच्या विरोधात पक्ष बदलत गेले, तसे उमेदवारही बदलले.
 Raksha Khadse
Raksha Khadse esakal
Updated on

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघाने सातत्याने भाजपलाच साथ दिल्याचा इतिहास आहे. गेल्या तीन लढतींचे चित्र पाहता, २००९ पासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी भाजपच्या विरोधात पक्ष बदलत गेले, तसे उमेदवारही बदलले. २०१४ पासून आता सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रत्येक वेळी बदललेल्या उमेदवारांनी नशीब आजमावले, पण ते सारे अपयशी ठरल्याचे दिसते. (Raver Lok Sabha Constituency)

जळगाव जिल्हा तसा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. ‘शत प्रतिशत भाजप’ ही संकल्पना जळगाव जिल्ह्याने प्रामाणिकपणे राबवली आणि संघटनेच्या बाबतीत जळगाव जिल्हा राज्यात नेहमीच क्रमांक एकवर राहिला. आताही त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. रावेर मतदारसंघही त्यापासून वेगळा नाही. या मतदारसंघावरही गेल्या अनेक वर्षांपासून अपवाद वगळता (१९९८-९९) भाजपचे वर्चस्व राहिले आहे.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी स्वतंत्र

सध्याचा रावेर मतदारसंघ पुनर्रचनेपासून अस्तित्वात आला. त्याआधी असलेल्या जळगाव लोकसभा क्षेत्रात १९९९ मध्ये वाय.जी. महाजन यांनी कॉंग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा ९० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघा पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. अर्थात, त्याच वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाला होता. राष्ट्रवादीतर्फे जे. टी. महाजन (जिवराम तुकाराम) उमेदवार होते, त्यांना १ लाख २० हजार ९५१ मते मिळाली. (Latest Marathi news)

 Raksha Khadse
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

बडतर्फीनंतरही भाजपच

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय. जी. महाजन निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा २० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. २००७ मध्ये भाजपचे तत्कालिन खासदार वाय. जी. महाजन यांच्या बडतर्फीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही याठिकाणी भाजपचा उमेदवार (हरिभाऊ जावळे) निवडून आल्याचा इतिहास आहे. जावळेंनी त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अर्जुन भंगाळेंचा २६ हजारांच्या मतफरकाने पराभव केला.

पुनर्रचनेनंतरही भाजपकडेच

२००९ मध्ये पुनर्रचना होऊन रावेर मतदारसंघ अस्तित्वात आला. आणि या पुनर्रचित मतदारसंघात हरिभाऊ जावळेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ॲड. रवींद्र पाटलांचा पराभव केला. २०१४ मध्ये हरिभाऊ जावळे यांना सुरवातीला उमेदवारी जाहीर झाली. मात्र, नंतर ऐनवेळी त्यांचे तिकीट रद्द करुन रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली.

मोदी लाटेत त्या वर्षी खडसेंना ३ लाख १७ हजारांचे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मनीष जैन यांचा पराभव झाला. २०१९ ला पुन्हा हा मतदारसंघ जागावाटपात कॉंग्रेसकडे आला. डॉ. उल्हास पाटील उमेदवार होते. रक्षा खडसेंना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. या निवणुकीत श्रीमती खडसेंचा ३ लाख ३५ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

 Raksha Khadse
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

म्हणजे, गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून रक्षा खडसे कायम आहे. पण, प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेस- राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आलटून पालटून निवडणूक लढली. पण, त्यांना यश येऊ शकले नाही.

आता पुन्हा राष्ट्रवादीशी लढत

या निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे आहे. या वेळी पुन्हा भाजपच्या विरोधातील पक्षाने उमेदवार बदलला असून या वेळी उद्योजक श्रीराम पाटलांना मैदानात उतरवले आहे.. बघू या, काय होते ते !

 Raksha Khadse
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com