Raver Lok Sabha Constituency : सहानुभूतीच्या लाटेवर रवींद्र पाटील होणार स्वार! शरद पवार गट खेळणार 'मराठा कार्ड'

Political News : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटायला तयार नाही
ravindra patil and sharad pawar
ravindra patil and sharad pawar esakal
Updated on

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटायला तयार नाही. एकीकडे माजी आमदार संतोष चौधरींनी त्यांना उमेदवारी मिळाल्याचे स्वतः जाहीर करत तयारी सुरू केलेली असताना आता या मतदारसंघात सामाजिक रचना लक्षात घेता मराठा उमेदवार हवा म्हणून पक्षात विचार सुरू आहे.

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील वडील प्रल्हादराव पाटलांच्या पुण्याई अन् स्वतःच्या सहानुभूतीचा मुद्दा पुढे करून 'यावेळी अखेरची निवडणूक.. यापुढे लढणार नाही, सांभाळून घ्या' असे भावनिक आवाहन करीत उमेदवारीवर स्वार होण्यास निघाले आहेत. (Jalgaon Raver Lok Sabha Constituency Ravindra patil Sharad Pawar group news)

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होऊन आठवडा लोटला. भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही (रावेर व जळगाव) मतदारसंघासाठी अनुक्रमे खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी याआधीच जाहीर केली आहे.

परंतु, प्रतिस्पर्धी मविआचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत, अथवा दोन्ही ठिकाणी कुणाच्या नावावर निश्चितीही झालेली नाही. रावेर मतदारसंघात मात्र जळगावच्या तुलनेत एक चित्र स्पष्ट आहे आणि ते म्हणजे याठिकाणी उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच असेल, तो आयात केलेला नक्कीच नसेल.

संतोष चौधरींची तयारी

गेल्या आठवड्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबईहून परतत स्वतःच्या उमेदवारीस पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगत समर्थकांकडून जल्लोष करून घेतला. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली. पण, दोन- तीन दिवसांत त्यांच्या या जल्लोषातील हवा निघाली.

रवींद्र पाटलांचे नाव

संतोष चौधरी, रक्षा खडसेंविरोधात कितपत लढत देतील हा प्रश्न उपस्थित करत काही पदाधिकाऱ्यांनी सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली. मतदारसंघातील सामाजिक समीकरण लक्षात घेता मराठा उमेदवार चांगली लढत देईल, असा विचार मांडला गेला आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटलांचे नाव पुढे आले.

स्वतः पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रावेर मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत जाऊन रवींद्र पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. अद्याप त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

बुधवारी २७ मार्चला मुंबईत होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकेल. रवींद्र पाटील हे स्वतः मितभाषी, संयमी नेतृत्व आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांना मान्य असणारा चेहरा म्हणून त्यांचे नाव निश्चित होऊ शकते. (latest marathi news)

ravindra patil and sharad pawar
Satara Lok Sabha : उदयनराजेंना दिलेला 'शब्द' अमित शहा पाळणार? साताऱ्याच्या उमेदवारीवरून भाजप-राष्ट्रवादीत घमासान!

भावनिक साद घालणार

रवींद्र पाटील हे याआधी रावेर मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढले आहेत. त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली आहे. परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता उमेदवारी मिळाल्यास ते वडील प्रल्हादराव पाटील यांच्या नावाने आणि 'आता ही माझी अखेरची निवडणूक आहे’ असे सांगून मतदारांना भावनिक साद घालू शकतील.

रावेर मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे वडिलांची पुण्याई स्वतःबद्दलची सहानुभूती आणि समाजाचे पाठबळ अशा त्रिसूत्रीतून त्यांना यशाचा विश्वास मिळवता येईल. म्हणून रवींद्र पाटील हे रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतील. येत्या दोन-तीन दिवसात त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सतीश पाटलांचाही आग्रह

याआधी पारोळ्याचे माजी आमदार व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनीही रावेर मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. ते देखील मराठा असून रावेर मतदारसंघातील सामाजिक समीकरण लक्षात घेऊन त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र ते स्थानिक नसल्याने त्यांच्या नावावर कदाचित विचार झाला नसेल. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडून पुन्हा रवींद्र पाटलांचे नाव समोर आले आहे.

ravindra patil and sharad pawar
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.