Jalgaon News : येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप सावळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या प्रश्नावर गुरुवारी (ता. २५) झालेल्या जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. (Raver status of sub district hospital )
याबाबत श्री. सावळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या दहा, पंधरा वर्षांपासून या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याबाबत प्रयत्न होत आहेत. मात्र त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. रावेरसह हा परिसर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या हद्दीला लागून असून, या रुग्णालयात ३० खाटांची सोय करण्यात आली आहे. या रुग्णालयात रोज ४०० ते ५०० रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. या परिसरात चार रेल्वे स्थानके, ५ धरणे, बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य मार्ग हे असल्याने अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. (latest marathi news)
येथून अत्यवस्थ रुग्णाला जळगावला हलविण्यासाठी किमान ७५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. रुग्णांसाठी हे अनेकदा धोक्याचे ठरले आहे. या रुग्णालयात रक्त साठवण केंद्र उपलब्ध असून, महिलांच्या अवघड प्रसूतीही केल्या जातात. उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी भरपूर जागा या रुग्णालय परिसरात उपलब्ध आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारे नकाशे आणि अंदाजपत्रकही तयार केलेले आहेत.
जिल्ह्यात आता तीन मंत्री असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीने या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी श्री. सावळे यांनी केली आहे. या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही आग्रही मागणी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.