Jalgaon Crop Insurance : पीकविमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा; पुनर्रचित हवामान आधारित योजना

Jalgaon : ‘फळ पीकविमा योजना आंबिया बहार’अंतर्गत विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नव्हता अशा नऊ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ५३ कोटींची रक्कम जमा होत आहे.
Crop Insurance
Crop Insuranceesakal
Updated on

जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित ‘फळ पीकविमा योजना आंबिया बहार’अंतर्गत विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नव्हता अशा नऊ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ५३ कोटींची रक्कम जमा होत आहे. या विमा योजनेंतर्गत २०२२ मध्ये एकूण ७८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता. (Jalgaon Crop Insurance)

त्यातील प्रलंबित असलेल्या ५४ हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसानभरपाईचा लाभ मिळणार होता. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार होता.

याअंतर्गत काही महिन्यांपूर्वी नऊ हजार शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ७२ लाख ७२ हजार ५७७ रक्कम वितरित करण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यातही काही शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित होते. अशा आज नऊ हजार ६९० शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतीच ५३ कोटी ७० लख ४२ हजार २४५ रुपयांची रक्कम जमा होत आहे.

त्यांनाही मिळणार लाभ

विमा कंपनीमार्फत ११ हजार २२ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आला होता. त्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून याबाबत जिल्हास्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत मागणी केली होती. (latest marathi news)

Crop Insurance
Jalgaon Agriculture News : ‘बारामती ॲग्रो’कडून ऊसाला 2600 चा भाव

त्यानुसार, पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यांपैकी आठ हजार १९० शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केल्यानंतर सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना पीक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरविण्यात येऊन, त्यांना लाभ मिळालेला आहे.

तसेच पीक विम्याचा लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत लाभ मिळाला असून, राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

"या विमा योजनेंतर्गत शेतकरी पात्र असूनही त्यांना विमा रकमेचा लाभ मिळाला नव्हता. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे, तसेच विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. त्याअन्वये या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. केंद्र व राज्य सरकारचे आभार."- रक्षा खडसे, खासदार, रावेर

Crop Insurance
Jalgaon News : अजित पवार गटाचा आज जिल्हा मेळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.