Inspirational Story : पितृछत्र हरपलेल्या प्रीतेशने केली ‘यूपीएससी’ क्रॅक; पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

Jalgaon News : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात कासोदा येथील तरुण प्रीतेश अशोक बाविस्कर (वाणी) हा ७६७ रँकने उत्तीर्ण झाला आहे.
Pritesh Baviskar
Pritesh Baviskaresakal
Updated on

नरेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा

कासोदा : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात कासोदा येथील तरुण प्रीतेश अशोक बाविस्कर (वाणी) हा ७६७ रँकने उत्तीर्ण झाला आहे. आठवीत असतानाच पितृछत्र हरपलेल्या प्रीतेशला आईने किराणा दुकान सांभाळून शिक्षित केले. काकांनी अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले अन्‌ त्याने पहिल्याच प्रयत्नात हे उल्लेखनीय यश संपादन केले. (Inspirational Story)

सामान्य कुटुंबातील विद्यार्थी

कासोदा येथील किराणा व्यावसायिक (स्व.) अशोक विनायक बाविस्कर यांचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. वडिलांचे अल्प आजाराने निधन झाले, त्या वेळी प्रीतेश इयत्ता आठवी आर. टी. काबरे एरंडोल येथे शिकत होता. वडिलांच्या निधनानंतर आई उज्ज्वला बाविस्कर व काका प्रदीप बाविस्कर यांनी अत्यंत प्रतिभावंत असलेल्या प्रीतेशला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

प्रतिकूल स्थितीत जिद्दीने शिक्षण

प्रीतेशने वडिलांच्या निधनानंतर अत्यंत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. वक्तृत्व, अवांतर वाचन आणि गणित विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. आई उज्ज्वला बाविस्कर यांनी पतीच्या निधनानंतर छोटेसे किराणा दुकान सांभाळून मुलांना शिकविले.

अभियांत्रिकीचा पदवीधर

वक्तृत्व हा त्याच्या अंगी असलेला विशेष गुण. संपूर्ण जिल्हाभरातून वक्तृत्व स्पर्धेत उत्तम यश मिळविले होते. त्यानंतर बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पुणे येथील सिंहगड कॉलेज येथे पूर्ण करून तेथेच स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. (latest marathi news)

Pritesh Baviskar
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात पाणीटंचाई 42 गावांवरून 53 गावांत; उन्हाळ्याची तीव्रता

याद्वारे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मुख्य व व मौखिक परीक्षेत यश संपादन करून देशात ७६७ रँकने उत्तीर्ण झाला. त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याने आज मन भरून येत असल्याची प्रतिक्रिया उज्ज्वला बाविस्कर यांनी व्यक्त केली. या यशामध्ये आई उज्ज्वला, काका प्रदीप बाविस्कर, काकू प्रतिभा, सर्व गुरू, मार्गदर्शक व मित्रपरिवार यांचा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया प्रीतेश बाविस्कर यांनी व्यक्त केली.

कासोद्यातून दोन आयएएस

कासोदा येथील हिरालाल भिका चौधरी यांचे पुत्र महेश चौधरी हे मणिपूर राज्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महेश चौधरी हे पहिले आयएएस आणि (स्व.) अशोक बाविस्कर यांचा मुलगा प्रीतेश बाविस्कर हे दुसरे आयएएस अधिकारी झाले आहेत.

Pritesh Baviskar
Jalgaon News : बायपास गावाबाहेर, व्यावसायिकांना घरघर; वाहने थांबत नसल्याने खादपदार्थ, शीतपेयांची विक्री मंदावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.