जळगाव : ‘साधुसंत येती घरा.. तोचि दिवाळी दसरा..’ असे आपल्याकडे म्हटले जायचे.. अलीकडच्या काळात हीच पंक्ती बदलून ‘पीएम-सीएम येती घरा..’ अशी म्हणावी लागेल. कारणही अर्थात, तसेच आहे. राज्याचा वा देशाचा कारभार हाकणारी नेतेमंडळी आली की, आपल्या जिल्हा, क्षेत्राच्या पदरात काही पडेल का, ही अपेक्षा करणे गैर नाही.
त्यादृष्टीने अशा ‘व्हीआयपी’ दौऱ्यांकडे पाहणे स्वाभाविक. आठवडाभराच्या अंतराने आपल्याकडे सीएम- पीएम येऊन गेलेत. हाती फारसे लागले नसले तरी संशयाच्या भोवऱ्यातील नार-पार गिरणा प्रकल्पाच्या निविदा प्रकियेस मंजुरीची बक्षिसी यानिमित्ताने मिळाली, हेही नसे थोडके. (=Results of pm Modi visit Nar Par tender approval reward)