Jalgaon Heavy Rain : परतीचा पाऊस नुकसानीस कारणीभूत! चाळीसगाव तालुक्यात कपाशीसह इतर पिकांनाही फटका

Heavy Rain : गिरणापट्ट्यात यंदा पावसाने टक्केवारीतील शंभरी ओलांडली आहे. गेल्या शुक्रवारी (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाला.
Heavy rain in city
Heavy rain in cityesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणापट्ट्यात यंदा पावसाने टक्केवारीतील शंभरी ओलांडली आहे. गेल्या शुक्रवारी (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाला. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात जमिनीतील अतिरिक्त पाण्यामुळे कपाशीवर लाल्या रोग पडला आहे. बोंडअळी, फुलकिडे व पांढरी माशी या रोगांनी पिकांचे नुकसान होत आहे. (Return rain caused damage to other crops including cotton in Chalisgaon taluka )

यावर्षी जास्तीच्या पावसाचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात पंचवीस ते टक्के घट होण्याची शक्यता आहे. नगदी पीक हातचे गेल्याने ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात सतत पडणाऱ्या या पावसामुळे कपाशीचे पीक लाल पडत चालले आहे. तालुक्यातील ९० हजार ३५२ हेक्टरवर जमीन लागवडीखाली आहे.

त्यात बागायत कपाशी ३० हजार ८३८ हेक्टर व जिरायत कपाशी ३२ हजार ०१३ हेक्टरने लागवड झाली आहे. एकूण ६२ हजार ८५१ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. काही भागात होणाऱ्या सततच्या पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. खरिपाच्या सुरवातीला पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची लक्षणीय लागवड झाली. किमान आठ ते नऊ हजार रुपयांपेक्षा प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित असल्याने क्षेत्र वाढले.

पावसाची गरज असताना यावर्षी वेळोवेळी पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस होत आहे. सततच्या या पावसाने कापसासह मका, ज्वारी, बाजरी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. मका कणसाला कोंबदेखील फुटले असून, नुकसान होत आहे. जमिनीत पाणी असल्याने पिकांना ‘नत्र’ घेता येत नाही. काही काळ ही परिस्थिती कायम राहिल्यास कपाशीवर ‘लाल्या’ रोग पडतो, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले. (latest marathi news)

Heavy rain in city
Jalgaon Heavy Rain Damage : गरपूरसह परिसरात पाऊस सहाशे पार! पिकांचे नुकसान; आता उघडीपीची गरज

उत्पादनात २५ टक्के घट येणार

सध्या रसशोषक किडी वाढण्यासाठी ढगाळ वातावरण कारणीभूत ठरले आहे. फुलकिडे, पांढरी माशी व बोंडअळी या रोगांनी झाडांवर परिणाम झाला आहे. पावसात फवारणी शक्य नसल्याने ठिकठिकाणी नुकसान झाले. तीन दिवस शेतात पाणी राहिल्यास नुकसानीची तीव्रता जास्त असते.

मुसळधार पावसाचा दुष्परिणाम झाल्यामुळे कापूस उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने जवळपास निम्मे उत्पादन घटले आहे. लागवड व मशागतीवर मोठा खर्च झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस पिकाचे रोगराईने नुकसान झालेल्या क्षेत्राचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कापसाची प्रत खराब

शेतात साचलेले पाणी तातडीने बाहेर काढणे आवश्यक असते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट व युरियाची फवारणी करतात. या उपाययोजना करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, इतर ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाण्यामुळे बोंडे परिपक्व झाली नाहीत. याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, कापसाची प्रत बिघडली आहे.

Heavy rain in city
Jalgaon Heavy Rain: खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती! परतीच्या पावसाचा फटका; चोपडा तालुक्यातील बळीराजा नुकसानीने चिंताग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.