जळगाव : जिल्ह्यावर यंदा वरुणराजाने कृपादृष्टी केली. सर्वच सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. सप्टेंबरपर्यंत पिकांची स्थिती चांगली होती. सप्टेंबरअखेर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत परतीचा पाऊस अतिवृष्टीचा ठरला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी सुन्न झाला आहे. सुमारे एक लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातील ७५ हजार हेक्टरवर केवळ कापूस आहे. मॉन्सून काळात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे. (Return rain cotton crop damage to Kharif crops on one lakh hectares in district)