Jalgaon Sand News : वाळू व मुरूम माफियांना महसूल यंत्रणेचा आशीर्वाद

Jalgaon Sand : तालुक्यात वाळू,मुरूम यासारख्या गौण-खनिजाची खुलेआम दिवसरात्र वाहतूक सुरु असताना महसूल प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
sand
sandesakal
Updated on

Jalgaon Sand News : तालुक्यात वाळू,मुरूम यासारख्या गौण-खनिजाची खुलेआम दिवसरात्र वाहतूक सुरु असताना महसूल प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. वाळू व मुरूम माफियांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद असल्याची सामान्यांची भावना झाली आहे. रात्रीच्या गस्तीवर असताना अमळनेर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील नंदनबाळ यांनी वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे ट्रॅक्ट्रर पकडल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (revenue administration ignored this while transportation of secondary minerals )

तालुक्यातील उत्राण,हनमंतखेडा,नागदुली,उमरदे,टाकरखेडे या गिरणानदीच्या पात्रालगत असलेल्या गावातून वाळूची अवैध वाहतूक सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरविली की काय अशी स्थिती आहे. उत्राण परिसरातून दररोज पंधरा ते वीस ट्रॅक्टर आणि दहा ते पंधरा डंपरमधून वाळूची अवैधरीत्या रात्री वाहतूक केली जात आहे. जळगाव व जामनेर येथील डंपरचालक उत्राण येथून वाळूची वाहतूक करीत असताना महसूल प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे.

प्रांताधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व निवासस्थानासमोरून वाळू माफिया गौण खनिजाची बिनधास्तपणे महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतूक करीत आहेत. हे सगळे वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच घडत असल्याची उघड चर्चा आहे. पद्मालय व अन्य ठिकाणाहून मुरुमाची दिवसभर अवैधरीत्या वाहतूक केली जात आहे.अवैधरीत्या गौणखनिजाची वाहतूक करणारे वाहने भरधाव वेगाने जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

sand
Jalgaon Sand Crime : अवैध वाळू वाहतुकीचा ‘रात्रीस खेळ चाले’; वरणगावात वाहनांची रात्रभर घर्र..घर्र

विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाहतूक केली जात असतांना आर.टी.ओंनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.वाळू अथवा मुरुमाची वाहतूक करणाऱ्यांना विरोध केल्यास वाळू माफियांकडून त्यांना धमकी दिली जाते. सहा महिन्यांपूर्वी उत्राण येथे प्रांताधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाळूची चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक बंद होईल अशी अपेक्षा होती,मात्र महसूल अधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर वाळूमाफियांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पोलिसांना दिसते

अमळनेर विभागाचे पोलिस उपअधिक्षक व कर्मचारी काल मंगळवारी (ता.२१) रात्रीची गस्त घालत असताना गालापूर रस्त्यावर त्यांना वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळले. पोलिस कर्मचाऱ्यांनी चालकाकडे वाळू परवान्याबाबत विचारले असता कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी एरंडोल पोलिस स्थानकात वाहन जमा करीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना अवैध वाळूची वाहतुकीचे वाहन सापडू शकतात तर महसूल प्रशासनाला गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने का दिसत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कार्यालयात राबता

वाळू व मुरुमाची वाहतूक करणाऱ्या माफियांच्या दलालांचा कायम तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालय परिसरात राबता असतो. तसेच वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वत: याकडे लक्ष घालून वाळू व मुरुमाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणा-यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी आहे.

sand
Jalgaon Sand News : भडगावचा वाळूमाफिया वर्षभरासाठी स्थानबद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.