Jalgaon News: धरणांच्या पातळीत वाढ; काही जेमतेमच! हतनूर धरणात 31.45 टक्के, ‘वाघूर’मध्ये 63.38 टक्के पाणीसाठा

Jalgaon News : गेल्या महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा या महिन्यात काहीसा वाढल्याचे दिसून आले आहे. हतनूर धरणात २.८३० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असून, तो ३१.४५ टक्के झाला आहे.
Archive photo of Hatnoor Dam
Archive photo of Hatnoor Damesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील काही धरणातील उपयुक्त पाण्यासाठ्यात वाढ झाली असून, काही ठिकाणी साठा जेमतेम आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा या महिन्यात काहीसा वाढल्याचे दिसून आले आहे. (Jalgaon Rise in dam levels 31 percent water in Hatnoor)

हतनूर धरणात २.८३० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असून, तो ३१.४५ टक्के झाला आहे. वाघूर धरणात ५.५६० टीएमसी पाणीसाठा असून, तो ६३.३८ टक्के इतका आहे. नाशिकमधील गिरणा धरणात २.१७० टीएमसी इतका पाणीसाठा असून तो ११.७४ टक्के झाला आहे. गूळ धरणात ०.५३० टीएमसी पाणीसाठा असून, तो ६५.८३ टक्के आहे.

तर धुळे जिल्ह्यातील अनेर धरणात ००.५६० टीएमसी इतका पाणी साठा असून तो ३२.१३ टक्के आहे. मात्र या धरणात सातपुड्यातून वाहून येणारे पाणी १५ ऑगस्टपर्यंत अनेर नदी पात्रात वाहून जाते. त्यानंतर धरणाचे दहा गेट बंद केल्यानंतर पाणीसाठा हळूहळू वाढून धरण १०० टक्के भरण्याचे आजपर्यंतचे अनुभव आहेत. (latest marathi news)

Archive photo of Hatnoor Dam
Palghar Assembly Election : पालघर मध्ये काँग्रेसचा 4 जगाचा आग्रह; महाविकास आघाडीत जागा वाटपात तिढा निर्माण होणार

प्रकाशा बॅरेजमध्ये १.०७० टीएमसी इतका पाणीसाठा असून, तो ४८.८३ टक्के आहे. तर तापी नदीपात्रातून वाहून जाणाऱ्या पाण्याने भरणाऱ्या गुजरातमधील उकई धरणात ७५.८७० टीएमसी पाणीसाठा असून, तो ३१.९२ टक्के इतका आहे.

तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात ३३.६६ टक्के, दारणा धरणात ४९.४९ टक्के, कडवा धरणात ४४.६७ टक्के, पालखेड धरणात १३.६३ टक्के, मुकणे धरणात १५.६४ टक्के आहे. तर करंजवण धरणात १.८६ टक्के पाणीसाठा आहे. काही धरणांच्या बॅकवॉटर परिसरात चांगला पाऊस झाल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली असून, काही क्षेत्रात अजूनही पाऊस जेमतेम असल्याने तेथील साठा अजूनही जेमतेम असल्याचे दिसून आले आहे.

Archive photo of Hatnoor Dam
Gram Sadak Yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 68 कोटी 76 लाख निधीस मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.