Jalgaon Road Damage: शहरातील चौपदरी महामार्गाची वर्षभरात लागली वाट! खर्च, तक्रारींबाबत NHAIचे हात वर

Jalgaon News : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर व त्यावर अपघातात अनेक बळी गेल्यानंतर मंजूर झाली होती.
Pothole lying on the service road near the highway near Agrawal Hospital. Potholes on highway in front of cement godown near Tambapura
Pothole lying on the service road near the highway near Agrawal Hospital. Potholes on highway in front of cement godown near Tambapuraesakal
Updated on

जळगाव : शहरातील चौपदरी महामार्ग, त्यावरील उड्डाणपूल, दुभाजक देखभाल- दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने कुशल, तांत्रिक/अतांत्रिक कामगारांची पात्रतेनुसार नियुक्ती केली आहे का? महामार्गाच्या कामावर आतापर्यंत किती निधी खर्च झाला? कंत्राटदाराविषयी प्राप्त तक्रारी, त्यावर केलेली कारवाई काय? अशा महत्त्वपूर्ण प्रश्‍नांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एकच ‘माहिती उपलब्ध नाही’ असे धक्कादायक उत्तर देण्यात आले आहे. (Jalgaon Road Damage NHAI marathi news)

जळगाव शहरातील सहा लाखांवर नागरिकांच्या जिवाशी संबंधित या महत्त्वाच्या प्रकल्पावर ७० कोटींहून अधिक निधी खर्च झालेला असताना अवघ्या वर्ष- दोन वर्षांत या महामार्गाची वाट लागली.. असे असूनही महामार्ग प्राधिकरणाने त्याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत ‘हात वर’ केले आहे.

निमखेडी शिवारातील रहिवासी दिनेश कडू भोळे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे माहितीच्या अधिकारात जळगाव शहरातील चौपदरी महामार्गाच्या झालेल्या कामाबाबत माहिती मागितली होती. त्यास प्राधिकरणाने दिलेल्या उत्तरे जळगावकरांना संतप्त करणारी आहेत.

महामार्गाचे सदोष काम

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर व त्यावर अपघातात अनेक बळी गेल्यानंतर मंजूर झाली होती.. म्हणून काम उच्च दर्जाचे होणे गरजेचे होते. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने सुरवातीपासूनच मनमानी कारभार करत या महामार्गाचा दर्जा, गुणवत्ता, तांत्रिकदृष्ट्या आवश्‍यक बाबी, राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचे सारे नियम व निकष धाब्यावर बसवत त्याचे सदोष काम केले. जांडू कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने हे काम केले असून कामाबाबत अगदी पहिल्या दिवसापासून तक्रारी आहेत.

बऱ्याच ठिकाणी तांत्रिक त्रुटी

ज्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड वर्दळ आहे, त्या चौकांमध्ये उड्डाणपुलांऐवजी सर्कल दिले. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक व अजिंठा चौफुली या तीनही चौकांमध्ये तांत्रिकदृष्ट्या सदोष सर्कल तयार करण्यात आले आहेत. त्यातून सुरळीत वाहतुकीची व्यवस्था होण्याऐवजी दररोज दिवसभर वाहतुकीचा बोजवारा उडलेला दिसतो.

दादावाडी, अग्रवाल हॉस्पिटल क्रॉसिंग व प्रभात कॉलनी चौकात उड्डाणपूल (अंडरपास) देण्यात आलेत. या उड्डाणपुलांवर वर्षभरातच खड्डे पडले. शिवाय, त्याला लागून सेवारस्त्यांची अवस्था गावखेड्यांच्या रस्त्यांपेक्षाही वाईट आहे.

रस्त्याचे काम सुरु असताना शहरातील काही तज्ज्ञ आर्किटेक्ट, अभियंत्यांनी वेळोवेळी बदल सुचविले. त्यापैकी काही बदल स्वीकारुन त्यानुसार काम झाले, मात्र अनेक सूचनांकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले व काम कसे तरी रेटून नेले. संपूर्ण महामार्गाचे काम तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही, हे प्रत्येक ठिकाणी दिसून येते. (Latest Marathi News)

Pothole lying on the service road near the highway near Agrawal Hospital. Potholes on highway in front of cement godown near Tambapura
Jalgaon Crop Insurance : कापूस, केळी पीक विम्याची रक्कम द्या

दुभाजक, पथदीपांची अवस्था

मुळात रस्त्याचे काम झाले तेव्हा, शहरातील महामार्ग म्हणून त्यावरील दुभाजकांत पथदीप लावण्याची व्यवस्था आधीपासूनच करायला हवी होती. पूर्ण रस्ता, दुभाजक झाल्यावर पुन्हा दुभाजकांना खोदून वायरिंग करण्यात आले. दुभाजकांमध्ये जे रिफ्लेक्टर लावलेत, त्यातील बहुतांश तुटले आहेत.. खराब झालेत. पण, ते बदलविण्यात आलेले नाही.

अशा मुद्द्यांचा उल्लेख करत दिनेश भोळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महामार्ग प्राधिकरणाचे नागपूर येथील क्षेत्रीय अधिकारी, तसेच जळगावातील प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना निवेदन दिले आहे.. करारनाम्यानुसार कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम परिपूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. भोळे यांनी दिला आहे.

.. अन्‌ विभागाकडे माहिती नाही

असे निकृष्ट व सदोष काम केलेले असताना महामार्ग प्राधिकरण विभागाकडे कंत्राटदाराने केलेल्या कामाबाबत, त्यावरील खर्चाबाबत तसेच देखभाल- दुरुस्तीसाठी नेमलेले कामगार कुशल, तांत्रिक आहेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसणे धक्कादायक आहे. अनेकदा महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी करुन, वृत्त प्रकाशित करुनही महामार्ग प्राधिकरण याबाबत उदासीन आहे.

Pothole lying on the service road near the highway near Agrawal Hospital. Potholes on highway in front of cement godown near Tambapura
Jalgaon Police Transfer: तालुक्यातील अनेक ठाण्यात नवे कारभारी! पोलिस अधीक्षकांनी फिरविली भाकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.