पारोळा : येथील अमळनेर रस्त्यावरील बायपास ते बालाजी शाळेजवळील रस्त्यावर रात्रीचा वेळी मोठा अंधार असल्यामुळे नवीन वसाहतधारकांसह अमळनेरकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अनेकदा या रस्त्यावरील अंधारामुळे चारचाकी-दुचाकीस्वार यांची डीव्हायडरला धडक झाली आहे. (Jalgaon Road lamp off on Amalner road Drivers suffering with colonists)
पारोळा शहरातील अनेकांना, तसेच येथील व्यापाऱ्यांना दळणवळणासाठी अमळनेर हे जवळ पडते. तसेच या मार्गातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बायपास ते बालाजी शाळेजवळील रस्ता या ठिकाणी पथदीपांअभावी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार असल्यामुळे वसाहतधारकांना रात्रीचा वेळी ये-जा करण्यासाठी स्वतः दिव्याची सोय करून वसाहतीत यावे लागत आहे.
तसेच, या मार्गावरून रात्रीच्या वेळी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र अंधारामुळे डीव्हायडरचा सामना करून पुढे जावे लागत असल्यामुळे वाहन चालविताना भंबेरी उडाली आहे. संबंधित विभागाला वारंवार तोंडी सूचना देऊन देखील या पथदीपांबाबत निर्णय होत नसल्यामुळे वसाहतधारकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अमळनेर रस्त्यालगत असलेल्या वसाहत या ना शहरांमध्ये ना ग्रामीण भागात, त्यामुळे हद्दवाढीचा मंजुरीच्या प्रतीक्षेत या नवीन वसाहतींकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वसाहतधारकांनी केला आहे. दरम्यान वसाहतीत कोणत्याही सुविधा नाही, रात्री-अपरात्री या रस्त्यावरूनच ये-जा होते. (latest marathi news)
पालिका व महावितरण या दोघांच्या समन्वयातून हा प्रश्न सुटू शकतो. मात्र याबाबत दोन्हीही विभाग का लक्ष देत नाही, असा प्रश्न वसाहतधारकांना पडला आहे. दरम्यान याबाबत तत्काळ निर्णय होऊन बायपास ते बालाजी शाळेबाहेर रस्त्यावरील पथदीप तत्काळ सुरू करावे, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.
"बंद असलेल्या पथदीपांबाबत आपली भूमिका सकारात्मक आहे. पालिकेने दिव्यांची पूर्तता केली, तर वीजपुरवठा आम्ही पुरवून पथदीप सुरू करता येतील."- गौतम मोरे, शहर अभियंता महावितरण, पारोळा
"या परिसरातील पथदीप बसविण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करू." -किशोर चव्हाण, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद, पारोळा
"गेल्या अनेक वर्षांपासून या वसाहतीत वास्तव्यास आहे. रात्रीच्या वेळी शहराकडे जाताना अमळनेर रस्त्याकडून जावे लागते. मात्र या ठिकाणी अंधार असल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होतात." - डॉ. रवींद्र सोनार, रहिवासी, अशोकनगर, भाग दोन, पारोळा
"अमळनेर रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देऊन वसाहतधारकांचा प्रश्न सोडवावा."-भरत चौधरी, रहिवासी अशोकनगर, भाग एक, पारोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.