Jalgaon Municipality News : 'अमृत'च्या नावाने नवीन रस्त्यांचा सत्यानाश सुरूच!

Jalgaon Municipality : जळगावकरांना बहुतांश भागात चांगल्या रस्त्यांच्या कामांचा दिलासा मिळत असला तरी महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत सुरु असलेल्या दोषपूर्ण कामाचा फटका या रस्त्यांना बसत आहे.
Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.
Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.esakal
Updated on

Jalgaon Municipality News : गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या समस्येने त्रस्त जळगावकरांना बहुतांश भागात चांगल्या रस्त्यांच्या कामांचा दिलासा मिळत असला तरी महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत सुरु असलेल्या दोषपूर्ण कामाचा फटका या रस्त्यांना बसत आहे. महाबळ मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झालेले असताना शुक्रवारी पुन्हा हा रस्ता अमृत जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी खोदण्यात आला. (Jalgaon roads are getting rough due to faulty work going on under Municipal Corporation Amrit scheme)

दरम्यान, परिसरातील नगरसेवक नितीन बरडे यांनी या रस्त्याचे काम होण्याआधी महापालिकेला कळवूनही ही कामे पूर्ण करुन न करता डांबरीकरण झाल्यानंतर पुन्हा वारंवार रस्ते खोदणं सुरु असल्याने संतप्त भावना आहेत.

दहा वर्षांपासून खड्ड्यांची समस्या

गेल्या आठ-दहा वर्षांपासून जळगावकरांना रस्त्यांमधील खड्ड्यांची समस्या भेडसावतेय. त्यात अनेकांना पाठ, मणक्यांसह सांध्यांचे आजार कायमस्वरुप जडले. तर काही अपघातांमुळे जायबंदी झालेत. दोन- तीन वर्षांत शहरातील बहुतांश भागात रस्त्यांची कामे सुरु होऊन ती कशीबशी पूर्णत्वास येत असताना तयार झालेल्या रस्त्यांवर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे खोदकामांची मालिका सुरुच आहे.

महाबळ रस्ता पुन्हा खोदला

काव्यरत्नावली चौक ते महाबळ व पुढे गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम साधारण दहा- बारा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. या रस्त्याचे काम होण्याआधी हा रस्ता ज्या प्रभाग क्रमांक १२ व १३मधून जातो, त्या प्रभागांच्या नगरसेवकांनी महापालिकेस अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी, नळजोडणी, व्हॉल्व्हजोडणी आदी कामे करण्याबाबत वारंवार सूचित केले. (latest marathi news)

Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.
Jalgaon Summer Heat : तापमानाचा पारा चाळिशी पार! उन्हाच्या झळा असह्य

त्यासंबंधी अनेकदा पाठपुरावाही केला. महापालिकेने नाहरकत दिल्यानंतरच मक्तेदार एजन्सीने या रस्त्याचे काम सुरु केले आणि ते पूर्ण झाले. आता हे काम पूर्ण होऊ जवळपास वर्ष झाले.. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही ठिकठिकाणी त्याचे खोदकाम सुरुच आहे. शुक्रवारी हा रस्ता पुन्हा महाबळ चौकातच नगरसेवक नितीन बरडे यांच्या घरासमोर खोदण्यात आला.

व्हॉल्व्हचे कारण

या रस्त्यातून गेलेल्या अमृत योजनेंतर्गत दोन वेगवेगळ्या जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी हे खोदकाम सुरु असल्याचे मनपा अभियंत्यांनी सांगितले. या परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. तेथील नागरिकांनी त्याबाबत तक्रार केली. पाणीपुरवठा विभागाने त्यासंबंधी चौकशी केल्यानंतर व्हॉल्व्ह बसविल्याशिवाय पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार नाही, असे समजले. त्यानुसार हे खोदकाम करण्यात आले.

याआधीही याच मार्गावर जाणता राजा जीमजवळ, मायादेवी मंदिराजवळ, पुढे पोलिस चौकीजवळही रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, अशा प्रकारे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे वारंवार खोदकाम सुरु असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. महापालिकेच्या या कारभाराविषयी जनतेच्या तीव्र भावना असून त्यांचा उद्रेक होण्याची वाट मनपा प्रशासन पाहतेय का? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.
Jalgaon Garlic Rate : लसूण आवाक्यात; गृहिणींना दिलासा

खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती नाहीच

नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ठराविक कालावधीपर्यंत मक्तेदाराची असते. मात्र, अशाप्रकारे मनपाने आपल्या कामासाठी रस्ता खोदला तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी मनपावर आहे. मात्र, अनेक ठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होतच नाही; तर काही ठिकाणी थातुरमातुर दुरुस्ती केली जाते, असे चित्र सर्वच दिसून येते.

त्यामुळेच राहिले ‘सीलकोट’

काव्यरत्नावली चौक ते महाबळ- संभाजीनगर व पुढे गाडगेबाबा चौकापर्यंतच्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झालेय. मात्र, त्यावर सीलकोट केलेले नाही. याबाबत ‘सकाळ’ने अनेकदा संबंधित मक्तेदार एजन्सी, नगरसेवकांना विचारुन पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी महापालिकेकडून अमृत जलवाहिनीतील दोष, अन्य कारणास्तव रस्ता असा वारंवार खोदण्यात येत असल्यानेच ‘सीलकोट’चे काम केलेले नाही, असे सांगण्यात आले.

Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.
Jalgaon News : फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल

"रस्त्याचे काम सुरु होण्याआधी अमृत योजनेतील काम पूर्ण करुन घेण्याबाबत आपण मनपा प्रशासनास वारंवार सूचना केल्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. आणि आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही वारंवार काही ना काही कारण शोधून, दोष दूर करण्यासाठी नव्याने तयार रस्ते खोदले जात आहेत."- नितीन बरडे, माजी नगरसेवक, प्रभाग क्र.१२

"महाबळ परिसरातील काही भागात अमृत योजनेंतर्गत सुरु झालेल्या पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत होता. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या दोन वाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी शुक्रवारी रस्त्याचे खोदकाम केले. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जाईल."- संजय पाटील, उपअभियंता, मनपा

Excavation underway on Friday to install valves on Mahabal road.
Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()