SAKAL Impact : वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी रस्त्यांवर ‘रम्ब्लर स्ट्रीप’; शहरातील प्रमुख मार्गांवर उपाय

SAKAL Impact : शहरात नव्याने होणाऱ्या रस्त्यांवर वाहने सुसाट धावत असताना, ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरतांय.
Rumbler strip on concrete road.
Rumbler strip on concrete road.esakal
Updated on

SAKAL Impact : शहरात नव्याने होणाऱ्या रस्त्यांवर वाहने सुसाट धावत असताना, ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरतांय. त्यामुळे या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच कॉंक्रिट रस्त्यांवर गतिरोधकांना पर्याय म्हणून रम्ब्लर स्ट्रीप बसविण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या कॉंक्रिट रस्त्यांवर ही व्यवस्था केली जाणार आहे. (Rumbler Strip on roads to control speed of vehicles )

जळगाव शहरात वेगवेगळ्या टप्प्यातून शासनाकडून प्राप्त कोट्यवधींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू आहेत. पैकी अलीकडेच ८२ कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जात आहे. सध्या या अंतर्गत काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक व पुढे स्वातंत्र्य चौक व नंतरच्या काळात थेट नेहरू चौक व टॉवर चौकापर्यंतच्या ५ किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे. या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, नव्या बसस्थानकाच्या पुढेही स्टेट बँकेपर्यंत येऊन पोहोचले आहे.

मात्र, या रस्त्यावर कुठेही गतिरोधक बसविलेले नाहीत. याचप्रमाणे अजिंठा चौक ते स्मशानभूमीपर्यंत पूर्ण झालेल्या कॉंक्रिट रस्त्यावर, रामानंदनगर ते डी- मार्ट, गणेश कॉलनी ते चित्रा चौक या डांबरी रस्त्यांवरही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावताना दिसतात. त्यामुळे या मार्गांवर अपघातांचा धोकाही वाढला असून, त्याबाबत ‘सकाळ’ने गुरुवारच्या (ता. ३०) अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. (latest marathi news)

Rumbler strip on concrete road.
SAKAL Impact : सारंगखेडा-कळंबू रस्त्यावरील ‘तो’ जीवघेणा खड्डा बुजवला

कॉंक्रिट रस्त्यांवर ‘रम्ब्लर स्ट्रीप’

शहरातील बहुतांश रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. कंत्राटदार एजन्सी वेगवेगळ्या असल्या, तरी या रस्त्यांच्या कामांवर बांधकाम विभागाचे लक्ष आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याबाबत विचार सुरू आहे. कॉंक्रिट रस्त्यांवर गतिरोधक बसविणे अधिक धोकादायक असते.

कारण, डांबरी रस्त्यापेक्षा कॉंक्रिट रस्त्यावर गतिरोधकामुळे वाहन अधिक तीव्रतेने उधळते व अपघाताचा धोका वाढतो. त्याऐेवजी अगदीच कमी उंची असलेल्या रम्ब्लर स्ट्रीप या मार्गांवर टाकण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती अथवा महापालिकेस सादर करण्यात येईल. नियोजन समितीच्या माध्यमातून निधी प्राप्त करून हे काम केले जाणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

डांबरी रस्त्यांवर गतिरोधक

या उलट डांबरी रस्त्यांवर रम्ब्लर स्ट्रीपऐवजी गतिरोधक टाकणे सोईचे असते. त्यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी तयार झालेल्या मोठ्या व प्रमुख डांबरी रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीही नियोजन समिती व महापालिका या यंत्रणांकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.

Rumbler strip on concrete road.
SAKAL Impact : नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा बसविण्यास सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.