Jalgaon News : पत्नी, मुलीस केटामाईन इंजेक्शन देत मारल्याचे सिद्ध; आरोपी सचिन जाधवला आजन्म कारावास

Jalgaon : आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला जळगाव जिल्हा न्यायालयाने आज आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
sachin jadhav
sachin jadhavesakal
Updated on

Jalgaon News : चारित्र्याचा संशयावरून पत्नीसह अल्पवयीन मुलीला केटामाईन विषारी इंजेक्शन देऊन त्यांचा खून केल्याचे सिद्ध होऊन आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला जळगाव जिल्हा न्यायालयाने आज आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना सरकार पक्षाने आठ वर्षे प्रदीर्घ न्यायिक कामाकाजानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करून आरोपीला आजन्म कारावासात पाठविण्यात यश मिळविले. (Sachin Jadhav convicted of killing wife daughter by injecting ketamine )

सचिन गुमानसिंग जाधव हा पत्नी कविता आणि मुलगी मीनाक्षी यांच्यासह जळगाव शहरातील रिंगरोड येथील एका हॉस्पिटलमध्ये वास्तव्याला होते. कविता ब्यूटिपार्लरचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असे, तर सचिन हा त्याच रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कार्यरत होता. आरोपी हा पत्नी कविताच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन छळ करत होता. अशातच ५ मे २०१६ च्या मध्यरात्री त्याने पत्नी कविता आणि मुलगी मीनाक्षी हे दोघेजण गाढ झोपेत असताना ‘केटामाईन’ हे भूलसाठी वापरात येणाऱ्या इंजेक्शनचा ओव्हरडोस टोचला.

त्यात दोघी मायलेकीला मृत्यू आला. घटनेनंतर संशयित सचिन जाधव फरारी झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसलाइनीतील एक गृहिणी त्यांच्या घरी आल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला होता. मृत कविता यांच्या भावाने तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सचिन गुमानसिंग जाधव, त्याचे वडील भाऊसह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

तपास अधिकारी सुप्रिया देशमुख यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकार पक्षातर्फे ॲड. नीलेश चौधरी यांच्यातर्फे एकूण २४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी तुषार राजपूत, डॉक्टर पाठक आणि महिलेच्या माहेरचे नातेवाईक यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

sachin jadhav
Jalgaon News : गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी कामगंध सापळे लावा; कृषी विभागाचा सल्ला

आरोपीच्या हुशारीवर कायद्याची कडी

आरोपी सचिन जाधव याने पत्नी व मुलीस इंजेक्शन टोचल्यानंतर तो तेथून पसार झाला. घडलेल्या घटनेला कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच नव्हता. पोलिस तपासात संशयिताने हवे तसे सहकार्य न केल्याने त्रुटी राहिल्या. तरी, सरकार पक्षातर्फे घटनास्थळावर प्राप्त पुरावे, सीसीटीव्हीत घटनेवेळी संशयिताचा रुग्णालयात वास्तव्य आणि गुन्ह्यासाठी वापरलेले इंजेक्शनचे रिकामे व्हायल कोठडीत असताना आरोपीने गुन्ह्याची कबुली देत नाल्यातून काढून दिले होते. अशा सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांची मांडणी अचूक पद्धतीने होऊन तब्बल आठ वर्षांचे परिश्रम ७० पानांचा लेखी युक्तिवाद सचिन जाधव याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास कामी आले.

असे कलम, अशी शिक्षा

- हत्येचे कलम ३०२ : आजन्म सश्रम कारावास, दहा हजार दंड

- भादंवि कलम २०१ : पुरावा नष्टकरणे, एक वर्षे सश्रम कारावास, हजार रुपये दंड

- दंड न भरल्यास चार महिने साधी कैद

एकूण संशयित : पाच

पुराव्याअभावी निर्दोष : चार

साक्षीदार तपासले : २४

कामकाज चालले : आठ वर्षे

सलग युक्तिवाद : चार महिने

सरकार पक्षाचा युक्तिवाद : ७० पाने

sachin jadhav
Jalgaon News : कामे होत नसेल तर तसे सांगा, बदली करते : केंद्रीय मंत्री खडसे; ‘दिशा’ समितीची बैठकीत इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.