SAKAL Impact : निंभोरा येथील रस्त्याचे काम ‘इस्टिमेट’नुसार करण्याच्या सूचना

SAKAL Impact : येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबाबत ‘सकाळ’ने रविवारी (ता. ९) वृत्त प्रकाशित करून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीवरून लक्ष वेधले होते.
Deputy Engineer of Public Works Department, Aji, former Sarpanch and villagers while inspecting the road which was closed for traffic.
Deputy Engineer of Public Works Department, Aji, former Sarpanch and villagers while inspecting the road which was closed for traffic.esakal
Updated on

SAKAL Impact : येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबाबत ‘सकाळ’ने रविवारी (ता. ९) वृत्त प्रकाशित करून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीवरून लक्ष वेधले होते. या बातमीची दाखल घेत जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वनाथ तायडे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामात पारदर्शकता आणावी व ‘इस्टिमेट’नुसार काम करावे व सूचना फलकही लावावे, असे निर्देश दिले.(Instructions to carry out road work at Nimbhora as per estimate)

आजी-माजी सरपंचांची दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपअभियंता विश्वनाथ तायडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या कामात दोन्ही बाजूने गटारी व रस्ता असे प्रस्तावित असल्याने दोन्ही बाजूंनी गटारीची कामे अपूर्ण असून, ती त्वरित सुरू करावी, असे आजी-माजी सरपंचांनी तक्रारीत म्हटले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तायडे व आजी-माजी सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने कामात पारदर्शकता आणावी व ‘इस्टिमेट’प्रमाणे करावे व सूचना फलकही लावावे असे निर्देश दिले. (latest marathi news)

Deputy Engineer of Public Works Department, Aji, former Sarpanch and villagers while inspecting the road which was closed for traffic.
SAKAL Impact : सारंगखेडा-कुकावल रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यास सुरवात; ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.