पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३वरील कजगाव चौफुलीलगत गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. मात्र, याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले जात होते. परिणामी दुचाकीसह वाहनधारक खड्डा चुकवीत प्रवास करीत होते. याबाबत दैनिक सकाळने २५ मे २०२४ रोजी ‘पारोळ्यात महामार्गावर जीवघेणा खड्डा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्याची संबंधित विभागाने दखल घेत तारीख एक जून रोजी हा या जीवघेणा खड्डा अखेर बुजविण्यात आला. दरम्यान सकाळने लक्षवेधी बातमी टाकून प्रवासांचे हित जोपासले म्हणून वाहनधारकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.
पारोळा शहरातील गरजू व लक्षवेधी समस्यांकडे ‘सकाळ’चे लक्ष आहे. शहरातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘सकाळ’ नेहमीच लक्षवेधक बातम्यांतून संबंधित विभागाला काम करण्यास भाग पाडत आहे.
येथील राष्ट्रीय महामार्ग ५३वरील कजगाव चौफुली महत्त्वपूर्ण मानली जाते. या चौफुलीवरून शहराकडे, चाळीसगावकडे, जळगावकडे व धुळ्याकडे वाहनधारक प्रवास करतात. त्यातच या चौफुलीवरील मध्यभागीच रस्त्याला मोठा खड्डा पडला होता.
त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करून किंवा खड्डा चुकवीत प्रवास करावा लागत होता. तरीदेखील या गरजू समस्येकडे महामार्ग प्राधिकरण दुर्लक्षच करीत होते. विशेष म्हणजे या चौफुलीवरून शहरातील अनेक लोकप्रतिनिधी ये-जा करीत होते. असे असतानादेखील या महत्त्वपूर्ण विषयाकडे सर्वजण कानाडोळा करीत होती.
मात्र, ‘सकाळ’ने प्रवाशांचे हित पाहता सदर विषय अधोरेखित केला. दरम्यान. शहरातील अनेक सामाजिक संघटनांनीदेखील खड्डा न बुजविल्यास आक्रमक पवित्रा घेतला होता. परिणामी संबंधित विभागाकडून या खड्ड्यात मुरूम टाकून तो बुजविण्यात आला. (latest marathi news)
चौफुलीवरील खड्ड्याची मलमपट्टी!
कजगाव चौफुलीवरील भला मोठ्या खड्डा होता. हा खड्डा कचखडी व डांबरीकरणाने बुजणे अपेक्षित होते. मात्र, त्यावर मुरूम टाकून थातूरमातूर मलमपट्टी म्हणजे तो खड्डा बुजविण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांत पावसाळा सुरू होत आहे. परिणामी मुरूमात पाणी गेल्यानंतर तो खड्डा खोलवर जाईल किंवा मुसळधार पावसाने खड्ड्यावरील मुरूम वाहून जाण्याची भीती आहे.
असे असतानादेखील संबंधित विभागाने काम चलाऊ भूमिका घेत खड्ड्याची डागडुजी केली आहे. या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे. दरम्यान कुटीर रुग्णालय ते अमळनेर चौफुलीपर्यंत महामार्गावर खड्डे पडले होते. तेव्हादेखील संबंधित विभागाने अशीच थातूरमातूर खड्डे बुजवीत प्रवाशांसह वाहनधारकांची दिशाभूल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.