SAKAL Impact : पारोळ्यातील उघड्यावरील 'ती' रोहित्रे झाकणबंद! सकाळच्या वृत्ताची घेतली दखल

Jalgaon News : या वृत्ताची तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीच्या यंत्रणेने प्रमुख रहदारीच्या भागातील उघड्यावर असलेले रोहित्रे त्वरित झाकणबंद केली.
Enclosed vehicles in traffic areas.
Enclosed vehicles in traffic areas.esakal
Updated on

पारोळा : वीज महावितरण कंपनीच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात रहदारीच्या भागातील काही रोहित्रे उघड्यावरच होते. याबाबत ‘सकाळ’ने ११ जूनला ‘प्रमुख रहदारीच्या भागातील रोहित्र उघड्यावरच’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीच्या यंत्रणेने प्रमुख रहदारीच्या भागातील उघड्यावर असलेले रोहित्रे त्वरित झाकणबंद केली. (jalgaon Rohitra on open in Parola closed)

शहरात तब्बल २०१ रोहित्रे आहेत. त्यातील बरेच रोहित्र भरवस्तीत किंवा रहदारीच्या मार्गांवर आहेत. बऱ्याच वेळा विजेचे काम करीत असताना, कर्मचाऱ्यांकडून ती उघड्यावर ठेवून त्याकडे दुर्लक्षित केले जाते. मात्र, उघड्यावरील रोहित्रात वीजपुरवठा सुरू असल्यामुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.

यासाठी ‘सकाळ’ने रहदारीच्या भागातील रोहित्रांची शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, बऱ्याच ठिकाणांचे रोहित्रे उघड्यावरच दिसून आली. त्यामुळे ‘सकाळ’ने रहिवाशीधारकांच्या हितासाठी महावितरणच्या नियोजनशून्य कामाबाबत वाचा फोडली. दरम्यान, ‘महावितरण’ने शहरासह तालुक्यातील उघड्यावर असलेले रोहित्रांची पुन्हा तपासणी करून ते तत्काळ बंदिस्त करण्यासाठी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (latest marathi news)

Enclosed vehicles in traffic areas.
Nashik News : ‘जलसंपदा’ला पाणीपट्टी रक्कम देण्यास नकार! उलट 23 कोटींच्या अनुदानाच्या परताव्याची मागणी

रहिवाशांकडून ‘सकाळ’चे आभार

गेल्या अनेक दिवसांपासून रहदारीच्या भागात रोहित्र उघड्यावर होते. याबाबत स्थानिक रहिवाशींनी अनेकदा ‘महावितरण’ला माहिती दिली होती. तरीही याबाबत कोणतीही अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे ‘सकाळ’ने स्थानिक रहिवाशींच्या या महत्त्वपूर्ण विषयाची वृत्ताच्या माध्यमातून दखल घेतली. महावितरणनेदेखील उघड्यावरील रोहित्र तत्काळ बंद केल्याने स्थानिक रहिवाशांनी ‘सकाळ’च्या या लक्षवेधी वृत्ताचे कौतुक करून आभार मानले.

Enclosed vehicles in traffic areas.
Sharad Pawar : सहा महिन्यात राज्यात आपले सरकार असेल ;शरद पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.