SAKAL Samvad : रुग्णांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पाठपुरावा; नवनिर्वाचित अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे

Jalgaon News : अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी नुकताच पदभार स्वीकारून रुग्णालयाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला.
Dr Sadananda Bhise
Dr Sadananda Bhiseesakal
Updated on

जळगाव, ता. २४ : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर राहील. रुग्णालय सर्वसामान्यांना आपले कसे वाटेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. चिंचोली येथील मेडिकल हब लवकर तयार होण्यासाठी पाठपुरावा करू, असा मानस जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयाचे निवनिर्वाचित अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी व्यक्त केला. (jalgaon SAKAL Samvad Dr Sadananda Bhise)

अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी नुकताच पदभार स्वीकारून रुग्णालयाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. भिसे म्हणाले, की जळगाव जिल्हा रुग्णालय व शासकीस वैद्यकीय महाविद्यालयाबाबत कोरोना काळापासून ऐकत आलो आहे.

यापूर्वीच्या अधिष्ठातांनी चांगली कामगिरी करीत रुग्णालयाचे रूप पालटले आहे. आपणही या रूपात अधिक भर घालू. ‘रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा’ या उक्तीनुसार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या व अत्याधुनिक यंत्राद्वारे सेवा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करू. (latest marathi news)

Dr Sadananda Bhise
Satara: जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फुटणार का? पावसाळी अधिवेशनाकडे सातारांचे लक्ष

एमआरआय मशीनसाठी पाठपुरावा

रुग्णालयाला एमआरआय मशीन मिळण्याबाबतचा आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हे मशीन लवकरच मिळविण्यासाठी पाठपुरावा करू. रुग्णालयात हृदयरोग तज्ञांसह अनेक डाक्टरांची पदे रिक्त आहेत, तसेच नर्सेसची संख्या कमी आहे. ही रिक्त पदे शासनाने लवकरात लवकर भरावीत, यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक वातावरणाची निर्मिती कशी होईल, यासाठी प्रयत्नरत असल्याचे डॉ. भिसे यांनी सांगितले.

Dr Sadananda Bhise
Teacher Constituency Election : वीस मतदान केंद्रांवर 200 अधिकारी, कर्मचारी! मतदानाच्या वेळेत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.