Jalgaon Anganwadi Sevika : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; राज्यातील 2 लाख जणांवर उपासमारीची वेळ

Anganwadi Sevika : राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे.
Anganwadi Sevika
Anganwadi Sevika esakal
Updated on

Jalgaon Anganwadi Sevika : राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे. लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम असताना मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. रखडलेल्या मानधन त्वरित अदा करावे; अन्यथा ऐन निवडणुकीच्या काळात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (jalgaon Salaries of 2 lakh Anganwadi workers were stopped in state marathi news)

राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्र असून, त्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. हे अंगणवाडी कर्मचारी कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देणे, ३ ते ६ वर्षाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, किशोरी मुलींना आरोग्य व स्वच्छ्तेबाबत मार्गदर्शन करणे, बालकांचे लसीकरण करणे आदी महत्त्वाची दैंनदिन कामे गावपातळीवर करीत असतात. (Latest Marathi News)

Anganwadi Sevika
Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविका, मदतनीस आक्रमक; संप चिघळण्याची शक्यता

असे असताना त्यांना मानधन न मिळाल्यामुळे आपले कुटुंब कसे चालवावे, असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन मुळातच अत्यल्प मानधन देते, तेही वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

आर्थिक कुचंबणा थांबवावी

सध्या लग्नसराई असल्यामुळे आणि शिक्षणाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त लागत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षित आहे. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल २०२४ या महिन्याचे रखडलेले मानधन तातडीने अदा करून त्यांची होणारी आर्थिक कुचंबणा आणि उपासमार थांबवावी; अन्यथा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका ऐन निवडणुकीच्या काळात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी दिला आहे.

Anganwadi Sevika
Anganwadi Sevika Strike Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.