Sambhaji Bhagat : ‘सर्वसामान्य माणूस’ हाच माझा चिंतनाचा विषय : लोकशाहीर संभाजी भगत

Jalgaon News : मानव कल्याणासाठी महापुरुषांनी केलेले सामाजिक कार्य व त्यांच्या विचारांची पेरणी ४० वर्षांपासून ‘जलसा’च्या माध्यमातून समाजात करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले.
Ravindra Shinde interviewing well-known democrat Sambhaji Bhagat
Ravindra Shinde interviewing well-known democrat Sambhaji Bhagatesakal
Updated on

Jalgaon News : सर्वसामान्य माणूस माझा चिंतन व प्रबोधन चळवळीचा विषय आहे. मानव कल्याणासाठी महापुरुषांनी केलेले सामाजिक कार्य व त्यांच्या विचारांची पेरणी ४० वर्षांपासून ‘जलसा’च्या माध्यमातून समाजात करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सुप्रसिद्ध गायक, अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक, कवी, साहित्यिक व लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये सांगितले. (Sambhaji Bhagat)

एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी श्री. भगत शुक्रवारी (ता. १२) जळगाव शहरात आले होते. त्यापूर्वी शासकीय विश्रामगृहात त्यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये आंबेडकरी जलसा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय चळवळ यासोबतच सांस्कृतिक व राजकारण आदी विषयांवर परखड विचार व्यक्त केले.

श्री. भगत म्हणाले, की पाच हजार वर्षे मौखिक पारतंत्र्यात असलेल्या समाजातील सर्वसामान्य माणूस बोलायला लागला. हे परिवर्तन एका दिवसात झाले नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यासह वारकरी सांप्रदायातील संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळेच हे सर्वांगीण व्यक्ती विकासाचे परिवर्तन शक्य झाले आहे. तत्कालीन समाजाला वाचा फोडण्याचे काम संतांनी अभंगांच्या माध्यमातून केले. या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून एकेकाळी मुका असलेला समाज व माणसं आज बोलायला लागली आहेत, नव्हे जगातील जवळजवळ सर्वच क्षेत्रांत यशस्वी होत आहेत. (latest marathi news)

Ravindra Shinde interviewing well-known democrat Sambhaji Bhagat
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

अन्‌ आंबेडकरी जलसा पुन्हा उभा राहिला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून ओळख देऊन त्याच्या सर्वांगीण विकासासाठी व भारताला आदर्श अशी राज्यघटना अर्थात संविधान देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. डॉ. आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर आंबेडकरी जलसा प्रबोधन चळवळ काही प्रमाणात कमी झाली होती.

साधारण १९९९पासून आंबेडकरी जलसा पुन्हा उभा राहिला. ‘सर्वसामान्य माणूस’ हाच माझा चिंतनाचा व ४० वर्षांपासून सुरू असलेल्या आंबेडकरी जलसा चळवळीचा केंद्रबिंदू राहिला आहे, असे श्री. भगत म्हणाले.

सांस्कृतिक राजकारणाशिवाय पर्याय नाही!

लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी समाजातील सर्वच चळवळी सक्रिय झाल्या पाहिजेत. राजकीयसोबतच सामाजिक, सांस्कृतिक राजकारण व सांस्कृतिक सत्ताही महत्त्वाची आहे. कारण सांस्कृतिक राजकारणाशिवाय पुरोगामी चळवळीला पर्याय नाही, म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध.

Ravindra Shinde interviewing well-known democrat Sambhaji Bhagat
Jalgaon News: लोकवर्गणीतून केली स्मशानभूमीसाठी जागेची खरेदी! सोनबर्डी, हणमंतखेडे बुद्रुक येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पुढाकार

संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वांगीण व्यक्ती विकासाचे विचार व कार्य समाजात सदैव जिवंत ठेवण्याचेे काम प्रत्येकाने करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले.

"आजच्या बदलत्या आधुनिक जीवनपद्धतीच्या काळात व्यक्तीसह सर्वच क्षेत्रे व सामाजिक जीवनावरही जागतिक घडामोडींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव स्वाभाविकपणे आपल्याला पाहायला मिळतो. मात्र, समाजातील साहित्यिक, विचारवंत, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या परिवर्तनाच्या कार्यात वैचारिक व मानवकल्याणाच्या विचारांचा दिवा कदापिही विझवू देता कामा नव्हे, असे मला वाटते." - संभाजी भगत, सुप्रसिद्ध लोकशाहीर

Ravindra Shinde interviewing well-known democrat Sambhaji Bhagat
Jalgaon News: वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक! रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांना यश; रद्द बस अखेर पंढरपूरला रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.