Jalgaon News: उन्हाळी सुट्टीतील ‘संध्या शाळा’ ठरतोय लक्षवेधी! खोकरपाट शाळेत उपक्रमशील शिक्षक भैय्यासाहेब साळुंके यांचा पुढाकार

Jalgaon News : खोकरपाट (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक भय्यासाहेब साळुंके यांच्या संकल्पनेतून उन्हाळी सुट्टी कालावधीत ‘संध्या शाळा’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जात आहे.
Active teacher Bhayyasaheb Salunke while teaching children in 'Sandhya School' activity at Zilla Parishad Primary School.
Active teacher Bhayyasaheb Salunke while teaching children in 'Sandhya School' activity at Zilla Parishad Primary School.esakal
Updated on

अमळनेर : घरातील दारिद्र्य, पालकांचे अज्ञान, गरिबीमुळे अनेकांना शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाच्या वयात पालकांसोबत ऊसतोडीसाठी, वीट कामासाठी स्थलांतरित व्हावे लागते. अशा बालकांचा संघर्ष सोपा व्हावा, स्थलांतरित बालकांचे शिक्षण गतीने व्हावे, यासाठी खोकरपाट (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक भय्यासाहेब साळुंके यांच्या संकल्पनेतून उन्हाळी सुट्टी कालावधीत ‘संध्या शाळा’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जात आहे. (Jalgaon Sandhya School during summer vacation in Khokarpat School)

काही आदिवासी कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी सेंधवा, शिरपूर, मध्य प्रदेशातून आली आहेत. आडरानात, शेतात जागल्याचे, तसेच सालदारकी करत जीवन जगत आहेत. आदिवासी कुटुंबातील बालकांना शिक्षण मिळावे. यासाठी खोकरपाट (ता अमळनेर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगेश लालसिंग पावरा, दिव्याला लालसिंग पावरा, कमलेश लालसिंग पावरा, अमना कुवरसिंग पावरा, दीपक कुवरसिंग पावरा, सारिका कुवरसिंग पावरा, ज्योती कुवरसिंग पावरा यांना प्रवेशित केले असून, त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लागावा, यासाठी भय्यासाहेब साळुंके यांनी उन्हाळी सुट्टीत सुरू केलेल्या ‘संध्या शाळा’ उपक्रमात आदिवासी बालकांना सहभागी करून शिक्षणाची संधी दिली आहे. (latest marathi news)

Active teacher Bhayyasaheb Salunke while teaching children in 'Sandhya School' activity at Zilla Parishad Primary School.
India Inequality: भारतात ग्रामीण, शहरी भागातील असमानता झाली कमी; केरळने मारली बाजी! किती आहे महाराष्ट्राची श्रीमंती?

१४ मे ते १४ जूनदरम्यान दुपारी चार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत हे अतिरिक्त वर्ग घेतले जात आहेत. या उपक्रमात स्थलांतरित २२ विद्यार्थ्यांना भाषा, गणित, इंग्रजी पेटीतील साहित्याच्या माध्यमातून मूलभूत क्षमता वृद्धीसाठी विविध अध्ययन कृतीचे मार्गदर्शन करण्यात येते.

सोबत विविध आव्हानांची निर्मिती करून विद्यार्थ्यांची स्वतः शिकण्याची गती वाढण्यासाठी मुख्याध्यापक रोहिणी बडगुजर व उपशिक्षक महेंद्र पाटील प्रयत्नशील आहेत. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी कविता सुर्वे, फापोरे केंद्रप्रमुख राजेंद्र गवते यांच्या प्रेरणेने बालकांसाठी प्रामाणीक प्रयत्न सुरू आहेत, हे विशेष!

Active teacher Bhayyasaheb Salunke while teaching children in 'Sandhya School' activity at Zilla Parishad Primary School.
Jalgaon MSRTC Depot: चोपडा आगार राज्यात प्रथम; सर्वाधिक उत्पन्नात अव्वल! उत्कृष्ट कामगिरीचे झाले मूल्यमापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.