Jalgaon News : साने गुरुजींच्या नावाने शहरात एक इंच भरही जागा नसली तरी त्यांच्या विविध अंगी व्यक्तिमत्व व कार्य कर्तृत्वामुळेच अमळनेर शहर हे साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. साने गुरुजी हे सुरवातीला विद्यार्थी म्हणून अमळनेरमध्ये १९२३ ला प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात दाखल झाले होते. साने गुरुजींनी येथील प्रताप हायस्कूलमध्ये केलेले सहा वर्षे अध्यापनाचे कार्यही उल्लेखनीय आहे. ते १७ जून १९२४ मध्ये प्रताप हायस्कूलमध्ये रुजू झाले होते. (Sane Guruji teacher teaches hundred Inspirational for teachers )
या घटनेला साने गुरुजीच्या शिक्षक होण्याला सोमवारी (ता. १७) तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. साने गुरुजी हे शिक्षकांचे मूळ पुरुष आहेत. म्हणूनच शिक्षक समुदायाला त्यांचे शिक्षक असणे नक्कीच प्रेरणादायक ठरत आहे. शाळेचे गांधीवादी मुख्याध्यापक श्री. गोखले व श्रीमंत प्रताप शेठ यांच्या सूचनेनुसार साने गुरुजी हे खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कूलमध्ये कार्यरत झाले होते. त्यांनी १७ जून १९२४ ते २९ एप्रिल १९३० या ६ वर्षाच्या काळात शिक्षक म्हणून नोकरी केली. (latest marathi news)
या घटनेला सोमवारी शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत. पांडुरंग साने यांच्या नावाला लागलेल्या ‘गुरुजी’ या बिरूदाचे अनोख्या पद्धतीने शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. साने आणि गुरुजी हे दोन्ही शब्द अगदी समानार्थी असावेत अशी महाराष्ट्रात अजूनही स्थिती आहे. याबाबत नानासाहेब गोरे म्हणत ‘गुरुजी’ या सामान्य नामाचे आपल्या गुणविशेषांनी साने गुरुजींनी विशेषणनाम बनविले. साने गुरुजींची पहिली ओळख ही शिक्षक म्हणून आहे. गुरुजींच्या प्रेरणेने अनेक प्रतिभावंत शिक्षक राज्यात तयार झाले आहेत.
राज्यातील १२५ शिक्षकांना सहभागी करणार
साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती तसेच साने गुरुजीना शिक्षक म्हणून १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा घेण्यात येणार आहे. लेखक राजा मंगळवेढेकर लिखित ‘साने गुरुजीची जीवनगाथा’ या पुस्तकावर आधारित वाचन अभिप्राय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे पुस्तक वाचून ८०० ते १००० शब्दात आपले अभिप्राय १ डिसेंबर २०२४ पर्यंत जमा करायचे आहेत. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असली तरी राज्यातील १२५ शिक्षकांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.