Jalgaon News : उन्मेश पाटील जिल्हा बँकेबाबत अज्ञानी : संजय पवार

Jalgaon News : जिल्हा बँक नाबार्ड व केंद्र शासनाच्या नियमानुसार व्यवहार करते. केवळ संचालकांनी ठराव केला, म्हणून चालत नाही.
Unmesh Patil
Unmesh Patilesakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा बँक नाबार्ड व केंद्र शासनाच्या नियमानुसार व्यवहार करते. केवळ संचालकांनी ठराव केला, म्हणून चालत नाही. आमदार, खासदारपद भोगूनही उन्मेश पाटील जिल्हा बँकेबाबत अज्ञानीच आहेत. त्यामुळे त्यांनी हवेत आरोप करण्यापूर्वी सर्व माहिती घ्यावी, असा टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत लगावला. माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा बँकेचा कारभार इंग्रजाप्रमाणे चालत असल्याचा आरोप केला होता. (Jalgaon Sanjay Pawar Statement Unmesh Patil ignorant about District Bank)

त्याला उत्तर देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष पवार यांनी जिल्हा बँकेत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की उन्मेश पाटील यांनी जिल्हा बँकेवर केलेले सर्व आरोप राजकीय हेतूने केले आहेत. ते कोणत्याही माहितीच्या आधारावर नाहीत. गटसचिव जिल्हा बँकेचा कर्मचारी नसतो. विकास सोसायटीच्या जमा झालेल्या वर्गणीतून त्याचा पगार होतो. विकास सोसायटी ५० लाखांवर अनिष्ठ तफावतीत आहेत.

त्या संस्थांच्या सभासदांना थेट कर्ज द्यावे, असा ठराव मागील संचालक मंडळाने केला आहे. हा ठराव आता झालेला नाही. त्यानुसारच आता हा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेने गटसचिवांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरलेल्या सभासदांना कर्ज द्यावे, असे आदेश बँकेने दिले आहेत. मात्र, गटसचिव संपावर गेले आहेत. त्यांनी संपावर जाणे चुकीचे आहे.

अनिष्ठ तफावतीची माहिती घ्या

श्री. पवार म्हणाले, की उन्मेश पाटलांनी अगोदर अनिष्ठ तफावर काय आहे, हे समजावून घ्यावे. त्यांनी आपली भेट घेतल्यास आपण त्यांना अनिष्ठ तफावत काय असते, हे समाजवून सांगू. माजी खासदार पाटील सभासद असलेली दरेगाव विकास सोसायटी अनिष्ठ तफावतीत कशी गेली याची माहिती घ्यावी. (latest marathi news)

Unmesh Patil
Jalgaon News : गांधलीत 18 कोटी लिटर्स पाणी जमिनीत जिरविण्याचा प्रयोग; ‘विप्रो’चा पुढाकार

खासदार असताना प्रश्‍न मांडले का?

उन्मेश पाटील पाच वर्षे आमदार, पाच वर्षे खासदार राहिले. या दहा वर्षांत त्यांनी जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधी मांडले का, असा प्रश्‍नही श्री. पवार यांनी उपस्थित केला आणि आता त्यांना या प्रश्‍नाची आठवण झाली.

गिरीश महाजन यांचे आमचे नेते

जिल्हा बँकेचे नेते गिरीश महाजन असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, की गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील आमचे नेते आहेत. त्यांनी आपल्याला चेअरमनपदावर बसविले आहे. मात्र, या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही. सर्वानुमते निर्णय घेण्यात येतो. गटसचिवांना हाताशी धरून त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजकारण करू नये. गटसचिवांचा प्रश्‍न संचालक मंडळात घेऊन आम्ही सोडविणार आहोत.

उन्मेश पाटील उभे का राहिले नाही?

उन्मेश पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकाराली. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. लोकसभेला स्वत: उमेदवारी न घेता त्यांनी करण पवार यांना उमेदवारी दिली आणि त्याला पुढे करून त्याचा बळी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते स्वत: का उभे राहिले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हानही श्री. पवार यांनी दिले.

Unmesh Patil
Jalgaon News : वेतनासाठी 49 कोटी 52 लाख 69 हजार मंजूर; शिक्षकांचा वेतन प्रश्न सुटल्याने मराठी नववर्षानंतर हर्ष उल्हास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.