Satpura Hills Tourism : सातपुड्याने नेसला हिरवा शालू! निसर्गाची किमया; वन्यप्रेमींना खुणावताहेत डोंगर कपारी

Jalgaon News : सातपुडा आता खुलून दिसू लागला आहे. पायथ्यावरून दिसणारा हिरवागार सातपुडा आता वन्यप्रेमी, पर्यटक व निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद मिळविणाऱ्यांना खुणावू लागला आहे.
Satpura area is full of lush greenery.
Satpura area is full of lush greenery.esakal

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशची उत्तर सीमा असलेल्या सातपुडा डोंगराच्या कपारीत झाडे हिरवीगार झाली आहेत. मृगाच्या पावसाने जमिनीवरचे अंकुर व लुसलुशीत गवताने रूप घेणे सुरू केले आहे. जणूकाही सातपुड्याने हिरवा शालूच नेसला आहे. त्यातच सातपुडा आता खुलून दिसू लागला आहे. पायथ्यावरून दिसणारा हिरवागार सातपुडा आता वन्यप्रेमी, पर्यटक व निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद मिळविणाऱ्यांना खुणावू लागला आहे. (Jalgaon Satpura hills greenery)

गुजरातच्या कोपऱ्यापासून खापर, मोरंबा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर यांच्या उत्तर सीमेला असलेल्या सातपुड्याच्या एक, दोन, तीन रांगा खानदेशात, तर उर्वरित मध्य प्रदेशात येतात. उन्हाळ्यात भलेही सातपुडा उघडा, बोडका दिसत असला तरी पावसाळ्याची चुणूक लागताच त्यातील उरल्या सुरल्या झाडांना हिरवी पालवी येते.

जमिनीवरची झाडेझुडपी व उघडानागडा डोंगर गवत अंगावर घेऊन खुलून दिसू लागतो. हळूहळू हेच गवत लूसलूशीतपणा धरत पुढे मोठे होते अन्‌ सातपुडा हिरवागार दिसू लागतो. डोळ्यांना खुणावणारे हे सौंदर्य वन्यप्रेमी व पर्यटकांना नेहमीच भुरड घालत आले आहे.

गुजरातच्या कोपऱ्यापासून देव मोगरा माता, देहली धरण, तोरणमाळ, करवंद बंधारा, नागेश्वर, अनेर धरण, नाटेश्वर मंदिर, खांडरागड, काजल माता, अनेर अभयारण्य, त्रिवेणी, चौगावचा किल्ला, गुळी धरण, मनुदेवी, शिरवेलचा महादेव आदी स्थळांवर श्रावण महिन्यात व पावसाळ्यात खूप गर्दी होते. (latest marathi news)

Satpura area is full of lush greenery.
Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनाला जायचंय... पण जरा जपून!

पर्यटकांना खुणावणारी ही स्थळे कायम पर्यटकांनी गजबजलेली दिसून येतात. मृग व आद्राचा पाऊस आला अन्‌ हिरवाई देऊन गेला. सुंदर दिसणारा सातपुडा आता हळूहळू काही ठिकाणी असलेली गर्द झाडीनी हिरवागार झाला आहे. त्यात लहान मोठे वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी यांचा विहार वाढू लागला आहे.

येत्या पंधरवाड्यात याच काळात मोकळ्या जागेत गुरे चरायला गेल्यावर गुरांच्या मागे असणाऱ्या गुराख्यांच्या बासरीचा आवाज आसमंतात अन्‌ डोंगर कपारीत घुमू लागेल. सातपुडा अजूनही हिरव्यागार झाडींनी वेढला आहे. अनेक डोंगर कपारी पावसाळ्यात मनाला मोहून घेतात. असा हिरवाईल्यालेला सातपुडा पुन्हा आता पर्यटकांचे पाय वळवू लागला आहे.

Satpura area is full of lush greenery.
Monsoon Travel : मोह आवरा; स्वतःला सावरा! पावसाळी पर्यटन करताना अतिसाहसाने घडू शकते दुर्घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com