Jalgaon News : सावखेडासिम ग्रामपंचायत सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Jalgaon : सावखेडासिम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर अतिक्रमण जागेत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले.
Order
Order esakal
Updated on

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या सावखेडासिम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर अतिक्रमण जागेत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले. सावखेडासिम येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात अतिक्रमण केल्याचा निष्कर्ष व विवेचन चौकशीअंति दिसून आल्याने बडगुजर यांना अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चला दिला. (Jalgaon Sawkhedasim Gram Panchayat Member Disqualified Decision of Collector)

ताहेर लतीफ तडवी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी व चौकशी झाली. त्यात निष्कर्ष व विवेचन यात आढळून आले आहे, की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील अहवालाचे अवलोकन केले असता सावखेडा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत आहे.

याबाबत २२ डिसेंबर २००६ पासून सुधारणा अंमलात आली आहे. ही सुधारणा अंमलात येण्यापूर्वी म्हणजे २१ डिसेंबर २००६ पूर्वी ज्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले होते व ते अतिक्रमण नियमित करण्यात आले होते, ते अपात्र ठरणार नाहीत.

तसेच अर्जदाराने ३० जानेवारी २०२४ ला प्रतिपत्राद्वारे तक्रारदाराविरुध्द तक्रार नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र सुनावणी दरम्यान सादर केलेले आहे. या प्रकरणी त्रयस्त पक्ष यांनी त्यांचे लेखी म्हणणे मांडले आहे. (latest marathi news)

Order
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील 4 तालुक्यांत जलपातळीत घट

वरील विवेचन पाहता अर्जदार उस्मान रमजान तडवी यांनी तक्रार मागे घेतली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या अहवालानुसार संबंधिताने अतिक्रमण केल्याचे सिद्ध होते व या प्रकरणी त्रयस्त पक्षकार यांचे म्हणणे मान्य करता येत नाही.

त्यामुळे अतिक्रमणधारक ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरत असल्याच्या निष्कर्षात आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. त्यानुसार १५ मार्च २०२४ अपात्रेचा निर्णय देण्यात आला.

Order
Jalgaon Water Scarcity : पारोळा तालुक्यात टंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण; खेडीढोक गावाला टँकरने पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.