School First Day : पारोळा तालुक्यात 11 शाळांची रंगरंगोटी पूर्ण; मिरवणुकीतून विद्यार्थ्यांचे स्वागत

School First Day : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढून स्वागत केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
Zilla Parishad school redecorated.
Zilla Parishad school redecorated.esakal
Updated on

School First Day : बंद असलेल्या शाळांचे शनिवारीत (ता. १५) दार उघडणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढून स्वागत केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पहिल्याच दिवशी गोड मिष्ठान्नही देण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण ११७ जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यात जिल्हा परिषद, खासगी शाळा व आश्रमशाळा मिळून तब्बल २१,९५३ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. ( School First Day in Parola taluka welcome students through processing )

पावसाळ्यापूर्वी ‘बाला’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील १७ शाळांसाठी रंगरंगोटी मंजूर झाली होती. त्यात ११ शाळांची रंगरंगोटी झाली असून, उर्वरित सहा शाळांमध्ये काम सुरू आहे. आठ खोल्यांची दुरुस्ती पूर्णत्वास आली आहे. तालुक्यातील ३६ शाळांच्या रॅम दुरुस्ती व शाळा खोल्यांची स्वच्छता झाली आहे. ग्रेड मुख्याध्यापकांची सहा पदे रिक्त असून, २० कार्यरत आहेत. मुख्याध्यापकांची एकूण संख्या २५ असून, २० कार्यरत, तर पाच पदे रिक्त आहेत.

तालुक्यात एकूण दहा केंद्रप्रमुख असून, तीन कार्यरत तर सात पदे रिक्त आहेत. मराठी पदवीधर शिक्षकांच्या एकूण जागा ४४ असून, २६ कार्यरत आहेत. १८ रिक्त आहेत. उर्दू पदवीधर शिक्षकांची संख्या आठ असून, आठही कार्यरत आहेत. मराठी माध्यमाचे उपशिक्षकांची ३८५ पदे मंजूर असून, ३८० कार्यरत आहेत. पाच पदे रिक्त आहेत. उर्दू उपशिक्षकांची १८ पदे मंजूर असून, १४ कार्यरत आहेत. (latest marathi news)

Zilla Parishad school redecorated.
School First Day : अमळनेर तालुक्यातील शाळांना मिळाल्या नवीन खोल्या; काही गावांत कामे सुरू

दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू वर्ग

विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य यात सातत्याने वाढ व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून १८ जूनपासून इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

''जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षकांनी शंभर टक्के अध्ययन करणे आवश्यक आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेला पालकांसह लोकसहभाग गरजेचा आहे.''-विश्वास पाटील, गटशिक्षणाधिकारी, पारोळा

Zilla Parishad school redecorated.
School First Day : भडगावात पहिल्याच दिवशी होणार स्वागत; 97 टक्के पुस्तके प्राप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.