Jalgaon News : शाळा बनल्या तळीराम, जुगाऱ्यांचे अड्डे! सावतरनिंभोरा, वझरखेड्यातील वास्तव; पालकांसह ग्रामस्थांमधून संताप

Jalgaon News : एकीकडे शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या वरिष्ठांकडून शिक्षकांच्या मदतीने प्रामाणिक प्रयत्न होत असतानाच मद्यपी, टवाळखोरांकडून त्याला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे
Addressing ongoing in Zilla Parishad school premises & empty liquor bottles thrown in Savatar Nibhonra school premises
Addressing ongoing in Zilla Parishad school premises & empty liquor bottles thrown in Savatar Nibhonra school premisesesakal
Updated on

भुसावळ : तालुक्यातील वझरखेडा आणि सावतर निंभोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तळीरामांनी व जुगाऱ्यांनी ‘अड्डा’ बनविल्याचे वास्तव समोर आले आहे. तळीरामांनी दारूच्या मोकळ्या बाटल्या टाकून दिल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या वरिष्ठांकडून शिक्षकांच्या मदतीने प्रामाणिक प्रयत्न होत असतानाच मद्यपी, टवाळखोरांकडून त्याला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. (Jalgaon Schools have become Taliram gambling dens)

एकीकडे शिक्षणासाठी विविध संघटनांचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे मात्र गावखेड्यांत तळीरामांची आपल्या गरजा भागविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. दारू दुकाने बंद असतानाही अवैधरित्या दारूविक्री होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. गावठी दारू व देशी, विदेशी दारूचा साठा केला जात आहे.

गावात दारू मिळत नसली तरी तळीरामांच्या संघटनाही बळकट होत असल्याचे चित्र आहे. गावामध्ये दारूचे दुकान जरी नसली तरी आम्ही आमचे व्यसन पूर्ण करणारच म्हणत तळीरामांकडून गावांमध्ये धुडगूस सुरूच आहे. दरम्यान, तालुक्यातील सावतरनिंभोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावातील तळीरामांनी शाळेची संरक्षणभिंत तोडून शाळेत प्रवेश करत ‘पार्टी’ केल्याचे चित्र दिसून आले आहे.

दारूच्या रिकाम्या बाटल्या, वेफर्स पाकिटांचा खच ग्रामस्थांच्या नजरेस पडल्याने संताप व्यक्त केला जात आहे वझरखेड्यातील शाळा सुटल्यानंतर आणि मंगळवार, रविवार या दिवशी तळीरामांसह पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांचा अक्षरशः धुमाकूळ असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांचे वास्तव पाहता तळीरामांकडून नियमांची ‘ऐशी तैशी’ केली जात आहे. (latest marathi news)

Addressing ongoing in Zilla Parishad school premises & empty liquor bottles thrown in Savatar Nibhonra school premises
IIT Salary: आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा पगार झाला कमी; ऑफर्समध्येही झाली घट, काय आहे कारण?

तर विविध विभागांचे बंद शासकीय कार्यालये व शाळांचा वापर तळीराम आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न होत असताना शिक्षकांच्या मदतीने होणाऱ्या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे कामकाही समाजकंटक करीत आहेत. कारवाईची मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

"मुख्याध्यापकांच्या हा विषय लक्षात आणून दिला असून, संबंधित शाळा समितीची तत्काळ बैठक घेण्यात येईल. शाळेच्या आवारात किंवा ओरांड्यात दारू पिणे, जुगार खेळणे, असे अवैध प्रकार बंद झाले पाहिजे, यासाठी गावस्तरावर बैठक घ्यावी, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत." - किशोर वायकोळे गटशिक्षण अधिकारी, भुसावळ

Addressing ongoing in Zilla Parishad school premises & empty liquor bottles thrown in Savatar Nibhonra school premises
Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com