Jalgaon News : रणरणत्या उन्हात मांडला पालावर संसार! नाशिक जिल्ह्यातील शेकडो मेंढपाळ जळगाव जिल्ह्यात दाखल

Jalgaon News : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव भागातून शेकडो मेंढपाळ बांधव आपल्या कुटुंब कबिल्यांसह तळपत्या उन्हाची पर्वा न करता रानोमाळ भटकंती करत पालावर संसार मांडत आहेत.
Shepherds with their families and clans who live on their stilts regardless of the scorching sun.
Shepherds with their families and clans who live on their stilts regardless of the scorching sun.esakal
Updated on

पहूर (ता. जामनेर) : सन १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गाता चल' या हिंदी चित्रपटातील 'धरती मेरी माता पिता आसमान मुझको तो अपनासा लगे सारा जहान' या गाण्याच्या ओळींची आठवण व्हावी, अशी दृश्ये पहूर परिसरातील शेतशिवारात सर्वत्र पाहायला मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव भागातून शेकडो मेंढपाळ बांधव आपल्या कुटुंब कबिल्यांसह तळपत्या उन्हाची पर्वा न करता रानोमाळ भटकंती करत पालावर संसार मांडत आहेत. (Jalgaon Hundreds of shepherds from Nashik entered Jalgaon)

सध्या पहूर परिसरात ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या तळपत्या उन्हात मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या - मेंढ्यांसह शेतशिवारात दाखल झाले आहेत. पाचोरा - जामनेर तालुक्यांमध्ये शेकडो मेंढपाळ बांधवांची कुटुंब आली आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत मेंढपाळ बांधव वर्षानुवर्षे आपला पारंपरिक पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. तुटपुंज्या मोबदल्यावर या मेंढपाळ बांधवांना उपजीविका करावी लागते. आपल्या मुक्या जीवांची सेवा करण्यातच मेंढपाळ बांधवांना धन्यता वाटते.

एका वाड्यावर साधारण २०० ते ३०० मेंढ्या असतात. लहान बालके, महिला यांच्यासह शेळ्या - मेंढ्या कुत्र्यांचा कबिला या मेंढपाळ बांधवांसोबत असतो. शेळ्या -मेंढ्या कुत्रे, घोडे हे देखील या मेंढपाळ बांधवांच्याच कुटुंबातील सदस्यांसारखे त्यांच्या जीवाला जीव देत असतात.

पालावर जन्म आणि लग्न देखील बऱ्याचदा पालावरच आई बाळाला जन्म देते. रात्री अपरात्री फारशा वैद्यकीय सुविधा नसतानाही नैसर्गिक क्षमतेवर बाळ आणि आईचं भरण - पोषण केल्या जाते. अनेकदा पालावरच लग्नही उरकले जातात. सण - उत्सव परंपरा या देखील मेंढपाळ बांधव जोपासत असतात निसर्गाच्या सान्निध्यात चिमुकली मुलं निरीक्षण करून संवर्धन करण्याचा प्रयत्न करतात. (Latest Marathi News)

Shepherds with their families and clans who live on their stilts regardless of the scorching sun.
Jalgaon Railway News : 6 महिने आधीच रिझर्व्हेशन का केले? रेल्वेच्या आरक्षित डब्यांतील घुसखोरी वाढली; प्रवाशांना मनस्ताप

२१ व्या शतकातही मेंढपाळ बांधवांची भटकंती अवस्था कायम आहे. बैलगाडी, घोडा गाडीचा वापर करून हे मेंढपाळ बांधव स्थलांतर करीत असतात. यामुळे त्यांच्या बालकांच्या शिक्षणावरही बऱ्याचदा विपरीत परिणाम होताना दिसतो. अक्षय तृतीया झाल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडी त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

"आम्ही सहा महिने भटकंती करून उपजीविका करतो. आमचं जगणं हे पालावरचेच आहे. त्यामुळे आम्हाला संकटे नवीन नाहीत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आम्हा मेंढपाळ बांधवांच्या २०० मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडली होती. आम्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहोत. त्यांना पालावर न आणता गावाकडे ठेवतो."- भावराव तांबे, मेंढपाळ, नांदगाव

"शेळ्या -मेंढ्यांचे मलमूत्र शेतीसाठी पोषक असते. रासायनिक खतांच्या गर्दीत नैसर्गिक खताकडे काहिसे दुर्लक्ष होत आहे. मेंढपाळ बांधवांना आम्ही शेतकरी योग्य ते सहकार्य करतो. त्यांचं जगणं अतिशय कष्टप्रद असते."- विकास उबाळे, शेतकरी, पहूर - कसबे

Shepherds with their families and clans who live on their stilts regardless of the scorching sun.
Jalgaon Devendra Fadanvis Daura : आम्हाला बिळातून काढण्याची भाषा करू नये : उपमुख्यमंत्री फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.