Jalgaon News : लोकसभा मतदारसंघात दाखल अर्जांची छाननी २० मुद्यांवर होणार आहे. यामुळे उमेदवारांनी त्या मुद्यांप्रमाणे अर्ज भरला किंवा नाही याची खात्री करावी, जे उमेदवार कंत्राटदार आहे व त्यांनी कामे अपूर्ण सोडल्याने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे, अशांचे अर्ज बाद होतील. मागील दोन वर्षांत शिक्षा झालेल्यांनाही ही अट आहे. (Jalgaon Scrutiny of applications filed in Lok Sabha constituencies done on 20 points)
अर्जासोबत राजकीय पक्षाचे ‘अ’, ‘ब’ अर्ज जोडलेले नाहीत, ते अर्जही बाद होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर या वेळी उपस्थित होते.
श्री. प्रसाद यांनी सांगितले, की उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपले स्वतंत्र खाते बँकेत उघडावे. निवडणूक खर्चावर निवडणूक खर्च निरीक्षकांचे लक्ष आहे. उमेदवारांनी केलेल्या खर्चाची २ मे, ७ मे व ११ मेस तपासणी होईल. खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयातून घ्यावा. उमेदवारांच्या अर्जांची छाननी वीस मुद्यांवर होईल. ते मुद्दे निवडणूक कार्यालयातून जाणून घ्यावेत. (latest marathi news)
अपर जिल्हाधिकारी पिनाटे म्हणाले, की जिल्ह्यात २० हजार निवडणूक कर्मचाऱ्यांपैकी १९ हजार ८४३ कर्मचारी आनलाइन परीक्षा देवून उत्तीर्ण झाले आहेत. उरलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित केले जाईल. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ५ किंवा ६ मेस होईल. १२ मेस अंतिम ट्रेनिंग आणि मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना होतील.
मुख्यमंत्री मदतीसाठी अहवाल
मौर्या ग्लोबल लिमिटेड कंपनीतील दुर्घटनेत आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. काही जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांच्या वारसांना व जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. मानवी चुकीमुळे या कंपनीत आग लागल्याचा अहवाल आला आहे. ‘एमआयडीसी’ने कंपनीला परवानगी दिली. एमआयडीसीला त्याबाबत कारवाईचे अधिकार आहेत. ते कारवाई करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.