Jalgaon News : पाणीचोरी करणाऱ्यांच्या मोटारी जप्त; पाचोरा पालिकेची कारवाई

Jalgaon : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर टाइप केटी बंधाऱ्यातून पाणी चोरी करणारे वीस पंप पालिका गस्ती पथकाने जप्त केले.
motor seized from kt dam by municipal team. Neighboring municipal employees.
motor seized from kt dam by municipal team. Neighboring municipal employees.esakal
Updated on

Jalgaon News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर टाइप केटी बंधाऱ्यातून पाणी चोरी करणारे वीस पंप पालिका गस्ती पथकाने जप्त केले. पालिका पथकाच्या या कामगिरीमुळे मात्र पाणी चोरी काही अंशी नियंत्रणात आली आहे. सदरच्या मोटारींचे मालक पुढे येत नसल्याने अद्याप पालिकेकडून फौजदारी कारवाई करण्यास अडचणी येत आहे. गिरणा नदी पात्रात ओझर (ता. पाचोरा) गावाजवळ बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यातून पालिकेमार्फत शहराला पाणीपुरवठा केला जातो. (Jalgaon Seized motor of water thieves)

गिरणा धरणातून सोडलेले आवर्तनाचे पाणी बंधाऱ्यात अडवून पाणीपुरवठा केला जात असला तरी एका आवर्तनाचे पाणी किमान तीन महिने पुरावे असा संकेत आहे. परंतु पाचोरा, भडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बंधाऱ्याच्या पाण्यात मोठ्या क्षमतेच्या जलपऱ्या (वीजपंप) टाकून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करतात.

त्यामुळे अवघ्या महिनाभरात आवर्तनाचे पाणी संपून केटी बंधारा कोरडाठाक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. उन्हाची वाढती तीव्रता आणि पाणी पुरविण्याचे आव्हान लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेत पाणी चोरावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करताना पालिकेने केटी बंधाऱ्यातून पाणी चोरी करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने बंधाऱ्यात वीजपंप टाकून पाणी चोरी करणाऱ्या सुमारे २० मोटारी मागील पंधरा दिवसात जप्त केल्या. किरण बाविस्कर, नरेश आदीवाल, सतीश जगताप, रामचंद्र बागुल, विकास जगताप, संजय वाकडे, किरण ब्राह्मणे, प्रभात बागरे या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (latest marathi news)

motor seized from kt dam by municipal team. Neighboring municipal employees.
Jalgaon News : दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षेनंतर ‘परीक्षा’

पाणी पुरवठा कालावधी वाढणार

केटी बंधाऱ्यातील पाणी चोरीचा परिणाम पालिकेच्या पाणीपुरवठ्यावर होत असून सध्या शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. यातच पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

"पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केटी बंधाऱ्यातील पाणी चोरी करणारे वीज पंप जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वतंत्र पथक नियुक्त असून त्यांच्याकडून पंप जप्त होत आहेत. फौजदारी कारवाई करण्याच्या पावित्र्यात पालिका प्रशासन असून शेतकऱ्यांनी पाणी चोरी थांबवावी आणि मोटारी स्वतःहून काढून घ्याव्यात." - मंगेश देवरे, प्रशासक, पाचोरा नगरपालिका

motor seized from kt dam by municipal team. Neighboring municipal employees.
Jalgaon Holi Festival : रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा करा वापर : तज्ज्ञांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.