Jalgaon News : बलात्कार प्रकरणी राजकीय पक्षाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला अटक

Jalgaon : अत्याचार करणाऱ्या राजकीय पक्षाच्या एका स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला पिडितेने तक्रार दाखल करताच अटक करण्यात आली.
Bhumesh Nimbalkar
Bhumesh Nimbalkaresakal
Updated on

Jalgaon News : विवाहितेस प्रेमाच्या जाळ्यात ओढत तीस लग्नाचे आमिष दाखवून, तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते, व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या राजकीय पक्षाच्या एका स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला पिडितेने तक्रार दाखल करताच अटक करण्यात आली. भूमेश बापू निंबाळकर (वय २६, रा. अयोध्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ()

शहरातील एका विवाहितेची काही दिवसापूर्वी भूमेश निंबाळकर याच्यासोबत ओळख झाली. ओळखीनंतर भुमेश याने विवाहितेला तु मला आवडते, तु तुझ्या पतीकडून घटस्फोट घे, मी तुझ्यासोबत लग्न करेल असे असे म्हणत तिचा विश्‍वास संपादन करत तिच्यावर अतिप्रसंग केला. याच दरम्यान संशयित याने पिडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.

विवाहितेने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर संशयित याने विवाहितेच्या पतीसह मुलीला मारुन टाकण्याची धमकी देत तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार केले. अखेर संशयित याचा त्रास सहन न झाल्याने पिडितेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. (latest marathi news)

Bhumesh Nimbalkar
Jalgaon News : अमळनेरातील 2 विद्यार्थ्यांचा रशियात पाण्यात बुडून मृत्यू; MBBSच्या शिक्षणासाठी दोघे होते रशियात

त्यानुसार संशयित भुमेश निंबाळकर याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान भुमेश निंबाळकर यासह अटक केल्यानंतर शहरातील एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संशयित भुमेश याचा आमच्या पक्षासोबत काहीच संबंध नसून तो पक्षाच्या कुठल्याच कार्यकारिणीत नसल्याचे सांगितले.

पिस्तुलासह कार जप्त

पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने संशयित भूमेश निंबाळकर याला अटक करत त्याच्याकडून महिलेला धाक दाखविण्यासाठी वापरलेली पिस्तूल आणि कार (एमएच १९ डीव्ही ७४७९), मोबाईल असे साहित्य जप्त केले आहेत. भुमेश निंबाळकर यास शनिवारी (ता.८) जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Bhumesh Nimbalkar
Jalgaon News : आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी 240 कोटींना तांत्रिक मंजुरी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.