Jalgaon Water Scarcity: जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, टँकरचे ‘शतक’! अनेक ठिकाणी भीषण स्थिती; टंचाईग्रस्त गावांची संख्याही 82 वर

Water Crisis : टँकरच्या संख्येने शंभरी गाठल्याने यंदा टँकर दीडशेचा आकडा पार करेल की काय, अशी भिती निर्माण झाली आहे.
Water Tanker Supply
Water Tanker Supplyesakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील तापमानाने ४७.२ अंश ओलांडून उच्चांक गाठला आहे. अतितापमानाने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. १४ दिवसांत पाणीटंचाईची गावे ६९ वरून ८२ वर गेली आहेत, तर टँकरची संख्याही ८२ वरून १०१ वर पोचली आहे. टँकरच्या संख्येने शंभरी गाठल्याने यंदा टँकर दीडशेचा आकडा पार करेल की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. (Jalgaon Severe water shortage in district)

जिल्ह्यात जसजसा उन्हाचा कडाका वाढत आहे, तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे. २ एप्रिलला २९ गावांत ३३ टँकरने पाणीपुरवठा होत होता. ५ एप्रिलला त्यात वाढ होऊन टंचाईची गावे २९ वरून ४२ वर गेली, तर टँकरही ३३ वरून ५१ झाले. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या ४२ वरून ५३ वर गेली. १४ एप्रिलला टँकर ५१ वरून ६९ वर (१८ टँकर) गेले. आता टंचाईग्रस्त गावे ५३ वरून ६९ (१६ गावे वाढली) पोचली आहेत. आज पाणीटंचाईची गावे ८२ झाली आहेत. आता टँकर ८९ वरून १०१ वर झाले आहेत.

२०२३ मध्ये ९३ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक होतील. यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२४ पासूनच सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात २ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

टँकर सुरू असलेली गावे अशी

तालुका--गावे--टँकर

जळगाव--५--७

जामनेर--१२--९

धरणगाव--०--०

एरंडोल--०--०

भुसावळ--१--१

यावल--०--०

रावेर--०--०

मुक्ताईनगर--०--०

बोदवड--०--०

पाचोरा--०--०

चाळीसगाव--३३--४६

भडगाव--६--६

अमळनेर--२०--२७

पारोळा--५--५

चोपडा--०--०

एकूण--८२--१०१

(latest marathi news)

Water Tanker Supply
Nandurbar Water Scarcity: टंचाईमुळे फिल्टर पाण्याच्या जार विक्रीत वाढ! सर्दीसह घशाच्या आजारांना निमंत्रण; केमिकलचा परिणाम

१३७ गावांसाठी १५७ विहिरींचे अधिग्रहण

जामनेर तालुक्यातील १४ गावांत १४ विहिरींचे अधिग्रहण, धरणगाव तालुक्यातील १३ गावांत १४ विहिरी, एरंडोलमधील ६ गावांना सात विहिरी, भुसावळमधील दोन गावांत दोन विहिरी, रावेर व बोदवड तालुक्यांत प्रत्येकी एका गावात एक विहीर, मुक्ताईनगरला सात गावांत सात विहिरी, पाचोरा तालुक्यातील तीन गावांत तीन, चाळीसगाव तालुक्यातील ३८ गावांत ४७ विहिरी, भडगावमधील २ गावांत २, अमळनेर तालुक्यातील ३१ गावांत ३७ विहिरी, पारोळ्यातील १२ गावांत १२, चोपडा तालुक्यात ३ गावांत सहा विहिरी, अशा एकूण १३७ गावांत १५७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Water Tanker Supply
Gangapur Water Crisis : गंगापुरात ठणठणाट; नागरिकांना प्यावे लागते विकतचे पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.