Jalgaon News : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आठवड्यात सुरू होणार; घरोघरी ड्रेनेज जोडणीही लवकरच

Jalgaon : सांडपाण्यावर प्रक्रिया करणार शिवाजी नगरातील लेंडी नाल्यानजीक उभारण्यात आलेला प्रकल्प पुढील आठवड्यात वीजेवर सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
Underground Sewerage Project of Municipal Corporation
Underground Sewerage Project of Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : सांडपाण्यावर प्रक्रिया करणार शिवाजी नगरातील लेंडी नाल्यानजीक उभारण्यात आलेला प्रकल्प पुढील आठवड्यात वीजेवर सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

शहरात वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्प्या महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. यासाठी शहरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज तयार करण्यात आले आहेत. (Jalgaon Sewage treatment plant to start in week)

सर्व सांडपाणी पाणी शिवाजी नगरातील लेंडीनाल्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पात एकत्रित करण्यात येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून हे पाणी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राला दिले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणार प्रकल्प शिवाजी नगरात उभारण्यात आला आहे. सद्य स्थितीत या प्रकल्पाची डिझेलद्वारे ट्रायल सुरू असून मक्तेदारांने या प्रकल्पाची मशिनरी सुरू केलेली आहे.

परंतु हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी विद्युत जोडणी आवश्‍यक आहे. महापालिकेतर्फे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याची स्वतंत्र विद्युत जोडणी सुरू करण्यात आली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वीज महावितरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जोडणी सुरू आहे. त्यांनी खांब उभारून विद्युत ताराही टाकल्या आहेत,परंतु आणखी काही काम वाढले आहे, ते कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम येत्या आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर विद्युत जोडणी पूर्ण होऊन हा प्रकल्प सुरू होईल.

ड्रेनेज जोडणी करणार

आठवड्यात हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर घराघरांतील शौचालयाचे पाईप ड्रेनेजला जोडले जातील. घराघरातील शौचालयाचे पाईप ड्रेनेजला जोडण्यासाठी महापालिकेतर्फे प्लंबर नियुक्त केले जाणार आहेत. (latest marathi news)

Underground Sewerage Project of Municipal Corporation
Jalgaon Municipality News : तळमजल्याच्या पार्किंगसाठी शीतल कलेक्शनवर हातोडा

महापालिका त्यांना प्रशिक्षण देउन जोडणीला पाठवतील. जोडणीचा दरानुसार नागरिकांनी रक्कम अदा करावयाची आहे. ही जोडणीही पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

"सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या शिवाजी नगरातील प्रकल्पाची विद्युत जोडणी अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठवड्यात त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल."- संजय नेमाडे (अभियंता पाणी पुरवठा महापालिका) जळगाव

"विद्युत जोडणी पूर्ण होऊन प्रकल्प सुरू झाल्यानंतर ड्रेनेज जोडणी सुरू होईल.घरोघरी जाऊन प्लंबर शौचालयाच्या पाईपला ड्रेनेजची जोडणी करतील यासाठी महापालिकेतर्फे प्लंबरांना प्रशिक्षण दिले जाईल."-योगेश बोरोले (प्रकल्प प्रमुख महापालिका जळगाव)

Underground Sewerage Project of Municipal Corporation
CM Shinde Jalgaon Daura : पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.