Jalgaon News : शहरातील शाहूनगर भागातील ट्रॅफिक गार्डनची अक्षरशः कचरा कुंडी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी फिरकत नसल्याने कचऱ्याचे ढीग लागले असून, पाणी तुंबून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Jalgaon Shahunagar Traffic Garden become Garbage Pit)
पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वी महापालिकेचा आरोग्य विभाग सक्रिय होतो. मात्र, जळगाव महापालिका निद्रिस्त अवस्थेत असून, कंत्राटी पद्धतीने कामे करण्यात येत आहेत. कंत्राटदार आणि महापालिकेतील वादामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
शहरातील ट्रॅफिक गार्डन परिसरात गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची उचल झालेली नाही, तसेच गटारीही तुंबल्या आहेत. शाहूनगर मार्केट व मटण मार्केटसमोर, पत्री मशिदीसमोरील भाग आणि माजी नगरसेवक धर्मा कदम यांच्या घरापासून ते थेट खानदेश मिल कॉलनीपर्यंत कचराच कचरा सर्वदूर पसरला आहे.
कुणी प्रतिसाद देईना...
परिसरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आरोग्य विभागासह कंत्राटदारांच्या माणसांना फोन लावला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वदूर दुर्गंधीसह कचरा कुंड्यांमध्ये पाण्याचे डबके साचून डासांची उत्पत्ती वाढली आहे. (latest marathi news)
डंपिंग ग्राऊंड
महापालिकेच्या आरेाग्य विभाग आणि परिसरातील रहिवाशांनी जागा डंपिंग ग्राऊंड केली आहे. कुठलेही अतिक्रमित बांधकाम, झाडे छटाईची घाण या परिसरात आणून टाकली जाते. या घाणीमुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
साथीची लागण
दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे ट्रॅफिक गार्डनसमोरील रहिवासी परिसर, पोलिस लाईन, जिल्हा परिषद कॉलनीत प्रत्येक घरांमध्ये लहान मुलांना मलेरिया, टायफाईडसारखे साथीचे आजार बळावले आहेत.
लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच नसल्याने घाणीतच गोरगरिबांची लहान मुले खेळायला जात असून, रोगराई घरात आणत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. शाहूनगरातील पडकी शाळेतील शौचालय महापालिकेने तोडल्याने तेथील रहिवासी अंधार पडल्यावर थेट त्या जागेचा शौचालय म्हणून वापर करीत असल्याने अधिकच त्रास वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.