Jalgaon Sharad Pawar : व्यक्तिगत अडचणींमुळे खडसे भाजपत जाण्याच्या निर्णयापर्यंत : शरद पवार

Jalgaon News : एकनाथ खडसे ज्येष्ठ व प्रभावी नेते आहेत. मात्र, त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी, समस्या असतील.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

Jalgaon News : एकनाथ खडसे ज्येष्ठ व प्रभावी नेते आहेत. मात्र, त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी, समस्या असतील. त्यामुळे त्यांनी आमचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असण्याची दाट शक्यता आहे, याचा पुनरुच्चार करत शरद पवारांनी त्यांची पाठराखण केली. खडसेंच्या राजीनाम्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, जयंत पाटलांकडे त्यासंबंधी माहिती असू शकते, असेही पवार म्हणाले. (Jalgaon Sharad Pawar)

रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारार्थ ते जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी भूमिका मांडली. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की सुरवातीपासूनच हा जिल्हा काँग्रेस विचारांना मानणारा आहे. मध्यंतरीच्या काळात हे चित्र बदलले असेल.

परंतु तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते सध्या जिल्ह्यात खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे या वेळी निकाल वेगळे असतील, असे पवार म्हणाले. भाजपचा उमेदवार पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, या गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार घेताना या मतदारसंघात १८ लाख मतदार आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

त्यामुळे महाजनांनी त्यांचे मताधिक्य कमी सांगितले, उलट त्यांचे उमेदवार १८ लाखांच्या फरकाने निवडून येतील, अशी उपरोधिक टीका पवारांनी केली. संतोष चौधरींचे भाषण तुम्ही ऐकले, त्यात कुठेही नाराजी दिसली का? असा प्रतिप्रश्‍न करत पवारांनी चौधरींच्या बंडाच्या विषयास पूर्णविराम दिला. या वेळी त्यांच्यासमवेत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेही उपस्थित होत्या.

मोदींचे भाषण पक्षापुरते मर्यादित

सभेच्या भाषणात मोदींवर टीका करण्यासंबंधी पवारांना विचारले असता, ते म्हणाले, की आपण अनेक वर्षांपासून निवडणुका पाहत आलो आहोत. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान प्रचाराला आले, की देशाविषयी, देशाच्या विकासासंबंधी बोलायचे.

मात्र नरेंद्र मोदी त्यास अपवाद आहेत. मोदी फक्त त्यांच्या पक्षापुरतेच बोलतात. त्यात कुठेही देशाच्या विकासाचे, देशहिताचे विषय नसतात. पंतप्रधान म्हणून भाषण अपेक्षित असताना त्यांचे भाषण एखाद्या पक्षाच्या नेत्यासारखे मर्यादित असते, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : घटनेच्या मुद्द्यावर विरोधकांची व्यूहनीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.