Jalgaon News : जिल्ह्यात मेंढ्या येण्यास सुरुवात! पीक संस्थांशी करार; ठेलारी बांधवांचे वाडेही दाखल

Jalgaon News : पश्चिम खानदेशात असलेल्या हजारो मेंढ्या दरवर्षी चराईसाठी आठ महिन्यांसाठी पूर्व खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांत येतात.
Thelari brothers coming from here to Jalgaon district with sheep.
Thelari brothers coming from here to Jalgaon district with sheep.esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : पश्चिम खानदेशात असलेल्या हजारो मेंढ्या दरवर्षी चराईसाठी आठ महिन्यांसाठी पूर्व खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांत येतात. आठ-नऊ महिने या भागात राहून त्यांची चराई होते. पावसाळा संपताच मेंढ्या येण्यास सुरुवात होते. त्यासाठी जिल्ह्यात मेंढ्यांसह ठेलारी बांधव दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, किनगाव, चिंचोली, धरणगाव, पिंप्री, रवंजे, बोदवड, भुसावळ तालुक्यातील काही भागांत एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या तालुक्यांतील काही शेतशिवारात या महिन्याभरात जवळपास एक लाख मेंढ्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतून जळगाव जिल्ह्यात प्रवेशकर्त्या होतील. (Sheep started arriving in district for fodder from khandeshi )

धुळे जिल्ह्यातील ठेलारी बांधव दरवर्षी जळगाव जिल्ह्यातील बागायती भागात असलेल्या पीक संस्थांमध्ये आठ महिन्यांसाठी करार करतात. त्या करारात त्या पीक संस्थांच्या कार्य कक्षेत येणाऱ्या शेतशिवारात मेंढ्या चारतात आणि त्याच शिवारात रात्री मेंढ्या बसवून मिळणाऱ्या मोबदल्याने पीक संस्थेला ठरवलेली रक्कम पूर्ण करतात. गेली अनेक वर्षे अशाप्रकारे ही पद्धत सुरू आहे. पावसाळा जवळपास संपण्यात आला असल्याने मेंढ्या येण्यास सुरुवात झालेली आहे. ठेलारी बांधवांचे काही वाडे सध्या रस्त्यावर दिसत आहेत. (latest marathi news)

Thelari brothers coming from here to Jalgaon district with sheep.
Jalgaon News : खड्ड्यात पडलेल्या दोघांचा विद्यार्थ्याने वाचविला जीव; अमळनेर येथील घटना

त्यांनी धुळे-अमळनेर, बेटावद-अमळनेर, दोंडाईचा-शिरपूरमार्गे-चोपडा अशा रस्त्यांवर सर्वत्र मेंढ्या दिसून येत आहेत. या मेंढ्या ठरलेल्या व करार केलेल्या पीक संस्थेच्या गावांमध्ये आठ महिन्यांसाठी थांबतील आणि तेथेच त्यांची चराई होईल. त्याच भागात ठेलारी बांधवांचे वाडे एखाद्या शेतात थांबतील. या आठ महिन्यांत त्यांचे सर्व धार्मीक विधी, शेंडी, जाऊळ, उत्तरकार्य, लग्नकार्य आदी सर्व विधी त्याच ठिकाणी पार पडतात.

आठ महिने चराईचा प्रश्न मिटतो

पश्चिम खानदेशातील वाघापूर, कढरे, छडवेल, पखरून, लामकानी, डोमकानी, बोरीस, वडणे, बुर्झड, जखाने, बेहेड, निमडाळे, मेहरगाव, दुसाने, इंधवे, फोफादे, निजामपूर, जैताणे, खोरी, गोताने, टिटाने आदी ठिकाणी ठेलारी बांधवांचे वास्तव्य आहे. तेथे त्यांची शेतीसुद्धा आहे. मात्र, आपल्या मेंढ्या चराईसाठी बागायती भागात ते आठ महिन्यांसाठी येतात. पावसाळ्यात आपापल्या गावी जातात. त्यामुळे मेंढ्यांचा चराईचा प्रश्न मिटतो. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठेलारी बांधव आपला वाडा घेऊन मेंढ्यांसह जळगाव जिल्ह्यात प्रवेशकर्ते होऊ लागले आहेत.

Thelari brothers coming from here to Jalgaon district with sheep.
Jalgaon News : पाणी भरण्यासाठी निघालेल्या गृहिणीने गमावला जीव; अजिंठा चौकात पहाटेचा थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.