Jalgaon News: शिवाजीनगर पुलाच्या T आकाराचे भिजत घोंगडे; निधी शिल्लक असूनही कामाची टाळाटाळ

Jalgaon Shivaji Nagar Bridge
Jalgaon Shivaji Nagar Bridgeesakal
Updated on

जळगाव : छत्रपती शिवाजीनगर पुलाचा ‘टी’ आकाराचा नकाशा तयार आहे. त्याला मंजुरीही आहे. महापालिकेने संपूर्ण अतिक्रमण काढून जागा तयार केली आहे. त्यासाठी दहा कोटींचा निधीही तयार आहे. केवळ काम सुरू करण्यावरून महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची टोलवाटोलवी सुरू आहे.

छत्रपती शिवाजीनगर पूल ‘टी’ आकारात करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली होती. त्याचा निधीही मंजूर झाला आहे. त्यानुसार नकाशाही तयार केला होता. मध्यतंरी ‘कोरोना’ची साथ आल्याने कामात संथपणा आला होता. त्याच काळात काही नागरिकांनी ‘टी’ आकाराला विरोधही केला होता, अशा स्थितीत पुलाचे काम अधिक काळ रेंगाळण्याचे चिन्हे दिसत होती. त्यामुळे ‘वाय’ आकाराचा पूल करून वाहतूक त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jalgaon Shivaji Nagar Bridge
Jalgaon Municipal Corporation : ‘अमृत’ मध्ये समाविष्टासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

‘वाय’ आकाराचा पूल सुरू

सुरवातीला ‘वाय’ आकाराच्या पुलाचे काम करण्यात आले. मात्र, पुलाची रंगरंगोटी व पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप टाकण्याचे, तसेच पुलावर डांबराचा एक लेअर टाकण्याचे काम अपूर्ण असताना, नागरिकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. कोणतेही उद्‌घाटन न होता या पुलावरून वाहतूक सुरू झाली अन्‌ ‘टी’ आकाराच्या कामाचा प्रश्‍नही रेंगाळला.

कामाची नागरिकांची मागणी

शिवाजीनगरच्या पुलाचे ‘वाय’ आकाराचे काम झाले असले, तरी त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिकच वाढला आहे. ‘टी’ आकार न झाल्याने अवजड वाहनासह सर्व वाहतूक शिवाजीनगरातील मध्यवर्ती भागातून होत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

याशिवाय शिवाजीनगरातील दाळफड, पाटील गल्ली, हुडको भागातील नागरिकांना पुलावर येण्यासाठी वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे ‘टी’ आकाराचे काम करावे, यासाठी काही नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

Jalgaon Shivaji Nagar Bridge
Pune Municipal Corporation: महापौर या शब्दाचा इतिहास माहिती आहे का? थेट सावरकरांशी आहे संबंध!

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी पण...

शिवाजीनगर ‘टी’ आकाराच्या पुलाचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण काढून द्यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. त्यानंतर महापालिकेने अतिक्रमण काढूनही दिले. त्यानंतर पूल बांधल्यास आजूबाजूस वाहतुकीसाठी जागा कमी पडेल, असे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाबाबत सांशकता व्यक्त केली.

मात्र, नकाशा तयार करताना या बाबी लक्षात घेण्यात आल्या आहेत. पुरेशी जागा वाहतुकीसाठी उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टी’ आकाराच्या रस्त्याची पाहणीही केली होती. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही.

Jalgaon Shivaji Nagar Bridge
Jalgaon Crime News: प्रियकराच्या नादात पतीच्या घरात टाकला डाका; सोन अन् लाखोंची रोकड घेऊन पत्नी फुर्रर्र

पूल ते ममुराबाद रस्त्याचे नकाशे तपासणी

शिवाजीनगरचा पूल टी. टी. साळुंखे चौकापुढे असलेल्या खासगी बालवाडीजवळ उतरत आहे. तेथून पुढे ममुराबादकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचे नकाशे जिल्हाधिकाऱ्यांनी मागविल्याचे सांगण्यात आले. या नकाशाच्या तपासणीनंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कामाचे भिजत घोगंडे

प्रशासनाच्या वादात पुलाच्या कामासाठी निधी असूनही काम सुरू झालेले नाही. भिजत घोगंड्यामुळे जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घेऊन काम सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Jalgaon Shivaji Nagar Bridge
Jalgaon News: ‘जलसंधारणा’ तील गैरव्यवहारप्रकरणी उपअभियंता निलंबित

''शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ आकारबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. ‘टी’ आकाराचा पूल ज्या ठिकाणी उतरतो, तेथून पुढे ममुराबाद रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचा नकाशा जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे. त्याची पाहणी झाल्यानंतर कामाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.'' -डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.