Jalgaon News: बाप्पा पावला..! श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानचे पालटणार रुप; मंदिराचे होणार सुशोभीकरण

Latest Marathi News : तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानचा कायपालट होणार आहे.
Srikshetra Padmalaya
Srikshetra Padmalayaesakal
Updated on

जळगाव : तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानचा कायपालट होणार आहे. मंदिर परिसरातील विकासासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सभागृह यासह अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने देवस्थानच्या ट्रस्टचे प्रयत्न सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात श्रीक्षेत्र पद्मालय येथे गणपतीचे मंदिर (Ganpati Temple) आहे. आमोद व प्रमोद अशा डाव्या- उजव्या सोंडेच्या दोन गणपतींचे स्वयंभू असलेले हे एकमेव देवस्थान. जिल्ह्यातून, खानदेशातून नव्हे तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अतिप्राचीन मंदिर म्हणून त्याचा लौकिक आहे. (Jalgaon Shri Kshetra Padmalaya Devasthanam marathi news)

विकासाची प्रतीक्षा संपणार

खरेतर, हे मंदिर म्हसावद- एरंडोल मार्गावर उंचावरील टेकडीवर वसले असून छोट्या घाटातून त्याठिकाणी जावे लागते. सभोवतालचा परिसर वृक्षराजीसह सौंदर्याने नटलेला. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर व सभोवतालचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत होता. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांचे त्यासाठी प्रयत्न सुरु होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंदिराच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी थोडा निधी मिळून जुजबी कामे व्हायची. मात्र, गिरीश महाजन यांच्याकडे पर्यटन विकासाचे खाते आल्यानंतर त्यांनी या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला व आता त्यातून मंदिर परिसराचा विकास होणार आहे.

सर्व सुविधाही होणार

पर्यटन विकासाच्या निधीतून प्रत्यक्ष मंदिरातील कामे केली जाऊ शकत नाही. मात्र, मंदिर परिसरात पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, सुशोभीकरण करता येते. त्यासाठी महाजन यांनी १० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातून मंदिर परिसरात विविध स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्यात प्रामुख्याने मंदिराच्या प्रांगणात उद्यान व सुशोभीकरण होईल. या मंदिरात दरवर्षी लग्नसराईत अनेक विवाह सोहळे होतात. गरीब, गरजू कुटुंब अगदी अल्प खर्चात या मंदिरस्थळी विवाह लावतात. मात्र, त्याठिकाणी एखादे सभागृह नसल्याने या निधीतून सभामंडपाचे काम केले जाणार आहे. (Latest Marathi News)

Srikshetra Padmalaya
Shiv Jayanti शिवविचारात सर्वांना तारण्याची क्षमता, आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिवचरित्राचे कसे करावे अनुकरण ?

घाटाच्या दुतर्फा पायऱ्या

नवसाला पावणारा गणपती म्हणून मंदिराची ख्याती आहे. हजारो भक्तांची ती श्रद्धा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील, विशेषत: जळगाव शहरातून अनेक भक्त चतुर्थी, गणेश जयंती, गणेशोत्सवात दर्शनासाठी पायी वारी करतात. रस्त्यावरुन जावे लागत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. म्हणून या मंदिराला जाण्यासाठी घाटातून दुतर्फा पायऱ्या करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. त्यामुळे क्तांची सोय होणार आहे.

देणगीतून मंदिर विकास

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांनी गेल्या महिन्यातच या मंदिराच्या विकासाबाबत भूमिका मांडली आहे. मंदिराचे काम पर्यटन विकास निधीतून करता येत नाही. मात्र, त्यासाठी अनेक भक्तांनी देणगी दिली असून, स्वत: श्री. जैनही त्यांचे योगदान देणार आहेत. त्या भरीव देणगीतून मंदिराचे काम करण्यात येणार असल्याचे श्री. जैन यांनी सांगितले.

Srikshetra Padmalaya
Gurumauli Annasaheb More : संसार सुखाचा व्हावा : गुरुमाउली मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.