Jalgaon Political News: नगरसेवकांची दिशाभूल करून ‘अजेंड्या’वर घेतल्या स्वाक्षऱ्या! बोदवड ‘राष्ट्रवादी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Jalgaon News : बोदवड नगरपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असून, नगराध्यक्षांच्या सहीचा मागील तारखेचा अजेंडा प्रकाशित करून ‘अजेंडा’ नगरसेवकांकडे सह्यांसाठी पाठविला होता.
NCP
NCP esakal
Updated on

बोदवड : नगरपंचायतीचा बोगस कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून, शहरात एका प्रवर्गाची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे. मागील ११ जुलैचा ‘अजेंडा’ १६ ला नगरसेवकांना देऊन त्यांच्याकडून सह्या घेतल्याचा प्रकार शहरात घडल्याने नगराध्यक्षांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (Signatures taken on Agenda by misleading corporators Complaint of Bodwad complaint of NCP)

बोदवड नगरपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असून, नगराध्यक्षांच्या सहीचा मागील तारखेचा अजेंडा प्रकाशित करून ‘अजेंडा’ नगरसेवकांकडे सह्यांसाठी पाठविला होता. या तारखांचा घोळ बघितल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या ही सभा बोगस होणार असल्याची कल्पना आल्यामुळे त्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

चर्चा न करता मागील तारखेत सभा दाखविणे, हा अपराध असल्याने त्याबाबत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वारंवार सांगितले आहे. सद्यस्थितीत बोदवड नगरपंचायतीचे प्रभाग चारची पोटनिवडणूक घोषित झाली असून, आचारसंहितेत अशाप्रकारचे कृत्य सुरू आहे. (latest marathi news)

NCP
Nashik Monsoon Dealey: पाऊस लांबल्याने 4 तालुक्यांतील पिके संकटात; खरिपाची पिके धोक्यात येण्याची शेतकऱ्यांना भीती

यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सभेच्या तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सभा रद्द केल्या आहेत. संबंधित पदाधिकारी व कर्मचारी नगरपंचायतीत अनागोंदी कारभार करीत असून, याबाबत गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

संबंधितांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. प्रभाग चारची पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असताना, नगरपंचायत कार्यालयातील मस्टर बाहेर जाणे, मागील तारखेच्या सभेचे अजेंडे नगरसेवकांकडे पाठविणे, हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील, याकडे बोदवडवासीयांचे लक्ष लागून आहे.

NCP
Jalgaon Heavy Rain: कमळगाव-मितावली रस्ता गेला वाहून! मुसळधार पावसाचा फटका; परिसरातील विद्यार्थ्यांचे बसअभावी प्रचंड हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.