Jalgaon Silver Rate Hike : सुवर्ण बाजारात बुधवारी (ता. २२) चांदीच्या भावात तीन हजारांची वाढ झाल्याने चांदी प्रतिकिलो लाखावर जाते की काय? याबाबत विविध अंदाज वर्तविले गेले. चांदीचा बुधवारी भाव प्रतिकिलो ९५ हजार ७९० रुपये जीएसटीसह होता, तर सोने ७६ हजार २२० (जीएसटीसह) प्रतिदहा ग्रॅम होते. १८ मेस अचानक सोने दीड हजारांनी, तर चांदीच्या भावात चार हजारांची ‘उसळी’ झाली. ()
सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ७६ हजार २२० (जीएसटीसह), तर चांदीचा भाव प्रतिकिलो ९३ हजार ७३० (जीएसटीसह) होता. लग्नसराई नसताना सोने, चांदीच्या भावात झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे. गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता. चांदीच्या भावातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर आली होती. सोन्यातील दरवाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. (latest marathi news)
गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्म घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला होता. आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे सोने, चांदीचे दर सात दिवसांपूर्वी घसरले होते. आता सातत्याने चांदीच्या दरात वाढ होत आहे. बुधवारी चांदीने ९५ हजार ७९० प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे.
सोन्याचे काही दिवसांतील दर (विनाजीएसटी)
तारीख--सोने (प्रतितोळा)-- चांदी (प्रतिकिलो)
*४ मे-- ७१ हजार २००--८१ हजार
*७ मे--७१ हजार ६५०--८३ हजार
*१८ मे--७४ हजार--९१ हजार
*२२ मे--७४ हजार--९३ हजार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.