Jalgaon : घरी बसून मुलं झाली हट्टी अन्‌ उद्धट

शाळा बंदचा परिणाम; सुसंवादाने करा समस्येवर मात
Mobile
MobileSakal
Updated on

जळगाव : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये दीड वर्ष बंद राहिल्याने मुले घरी बसून होती. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी शाळांच्या वातावरणापासून वंचित राहिल्याने मुलांवर विपरीत परिणाम होऊन मुले हट्टी, ऐकेनाशी आणि उद्धट झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अर्थात, या समस्येवर त्यांच्याशी सुसंवाद साधणे हे चांगले सोल्यूशन असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दीड वर्षापूर्वी म्हणजे मार्च २०२० मध्ये कोरोनारूपी महामारीचा शिरकाव झाला आणि आपल्या देशाचेच नव्हे तर साऱ्या जागाचे जीवनमानच बदलून गेले. समाजातील प्रत्येक क्षेत्र, घटक त्यामुळे प्रभावित झाला. कोरोनाने अनेक जीव गमावले, तर लॉकडाउनचे गंभीर परिणामही समोर आले, त्यातून जग आणि पर्यायाने आपला देशही सावरलेला नाही. पण, सारेच जण आपापल्या परीने सावरण्याचा प्रयत्न नक्की करतायत.

शैक्षणिक क्षेत्र प्रभावित कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षणक्षेत्राला बसला. देशात व महाराष्ट्रातही जवळपास दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. काही ठिकाणी ती टप्प्याटप्प्याने, कमी क्षमतेने सुरु झाली. मात्र, पुन्हा बंद करावी लागली. आता गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक जीवनही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मुलांवर विपरीत परिणाम शाळा-महाविद्यालये व शिकवणीच्या वर्गात आठ-दहा तास घालविणारी मुले दीड वर्षापासून घरी बसून आहेत. त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी तो मर्यादित काळासाठी असून, त्याच्याही मर्यादा उघड झाल्या आहेत. बाहेर पडणेच बंद असल्याने मुले मोबाईल, कॉम्प्युटरच्या नादी लागून घरकोंबडे झाली.

असा झाला परिणाम विशेषत: लहान मुलांवर या गोष्टीचे विविध परिणाम झाले आहेत. खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्याने व बाहेर न पडल्यामुळे व्यायाम होत नसल्याने मुलांना अनेक शारीरिक व्याधी जडल्या. काहींची मानसिकता बदलली. मुले चिडचिडी होणे, कुणाचेही न ऐकणे, उलट उत्तर देणे, मोठ्यांचा आदर न राखणे अशा प्रकारच्या समस्या समोर आल्या आहेत. मुलांवर नियंत्रणासाठी पालकांनी या काळात त्यांना रागावणे, प्रसंगी मारणे, शिक्षा करणे आदी प्रकार केल्याने त्याचेही गंभीर परिणाम समोर आले आहेत. सुसंवादातून समस्या सुटेल असे असले तरी तज्ज्ञांच्या मते मुले हट्टी, उद्धट झाली असली तर त्यांच्यावर रागावणे, मारणे अथवा शिक्षा करणे हा पर्याय नाही. तर त्यांच्याशी संवाद साधून, त्यांचे योग्य प्रकारे समुपदेशन करून त्यातून मार्ग काढता येणे जास्त सयुक्तिक व योग्य आहे.

Mobile
सचिन-शेन वॉर्नला भावलेला 'लिटल लेग स्पिनर' आहे तरी कोण?

दीड वर्षापासून मुले घरीच असल्याने कमी-अधिक प्रमाणात सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांच्या मनावर अशा प्रकारचे परिणाम होऊन त्यांच्यात बदल झाले आहेत. मात्र, त्यांच्याशी दररोज सुसंवाद साधून, मनमोकळेपणाने बोलून, त्यांच्याशी मैत्री करून या समस्येवर मात करता येईल. पालकांनी केवळ पालकांच्या भूमिकेत राहू नये. आता शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांनीही मुलांमधील हे बदल समजून घेतले पाहिजेत. -चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.