Jalgaon News : बोदवड सिंचन योजनेच्या पंपगृहाचा स्लॅब कोसळला! ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

Jalgaon : तालुक्यातील बोदवड उपसा सिंचन योजनेंतर्गत सुरू असलेल्या पंपगृह १ ‘ब’चे काम प्रगतिपथावर असताना पंपगृहाचा स्लॅब निकृष्ट कामामुळे कोसळला.
Bodwad Collapsed slab of Upsa irrigation scheme pump house.
Bodwad Collapsed slab of Upsa irrigation scheme pump house.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील बोदवड उपसा सिंचन योजनेंतर्गत सुरू असलेल्या पंपगृह १ ‘ब’चे काम प्रगतिपथावर असताना पंपगृहाचा स्लॅब निकृष्ट कामामुळे कोसळला. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. ठेकेदाराची चौकशी करून ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पंपगृहाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले असून, या कामावरील वारंवार बदलण्यात आलेल्या विना अनुभवी सबलेट ठेकेदारांमुळे या पंपगृहाचे काम सहा वर्षांपासून रेंगाळले आहे. (Jalgaon slab of Bodwad irrigation scheme pump house collapsed)

या पंपगृहाच्या निकृष्ट कामाबाबत परिसरातील विविध सामाजिक व राजकीय संघटना वारंवार आंदोलने व निषेध करीत आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी पंपगृह १ ‘ब’च्या स्लॅबचे काम प्रगतिपथावर असतानाच स्लॅब कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित्तहानी झाली नसली तरी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या हजारो कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असताना स्लॅब कोसळणे, ही गंभीर बाब आहे.

खेदाची बाब म्हणजे या कामाचे स्टील बांधणी सुरू असताना आधी व नंतर विभागीय अधिकाऱ्यांकडून वारंवार घटनास्थळाची प्रत्यक्षात पाहणी न करता फक्त अहवालाचे कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्यामुळे हा स्लॅब कोसळण्याचा भयावह प्रकार बोदवड उपसा योजनेच्या पंपगृहामध्ये घडल्याच आरोप करण्यात आला आहे. (latest marathi news)

Bodwad Collapsed slab of Upsa irrigation scheme pump house.
Jalgaon Water Crisis : भुसावळच्या शिवदत्त नगरात पाणीटंचाई

अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष भोवले

स्लॅब कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे संबंधित महातज्ज्ञ, पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ठेकेदारांने नेमणूक केलेल्या कारागिरांच्या भरवशावर हे काम सोडले. संबंधित ठेकेदाराने स्टील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आधी आडवे बीम काँक्रीटने भरणे अंदाजपत्रकानुसार बंधनकारक होते.

त्यानंतर स्लॅब भरणे गरजेचे होते. परंतु, संबंधित ठेकेदाराने एकाच वेळी बीम व स्लॅब भरण्याचा प्रयत्न केल्यामुळे ओल्या काँक्रीटच्या मटेरियलचे ओझे सपोर्टिव्ह पाईपला न झेपल्यामुळे हा स्लॅब कोसळलेला आहे.

"बोदवड उपसा सिंचन प्रकल्पाच्या कोसळलेल्या स्लॅबच्या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित दोषी ठेकेदाराला तत्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे."- प्रमोद सौंदळे, राज्य संघटक, बहुजन मुक्ती पार्टी

Bodwad Collapsed slab of Upsa irrigation scheme pump house.
Jalgaon News : वरणगाव पालिका कार्यालयाचे स्थलांतर! लवकरच नवीन इमारतीतून चालणार कारभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.