Jalgaon News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतातील कृषिपंपांसाठी दिवसा वीज मिळावी, ही मागणी राज्यातील शेतकऱ्यांमार्फत केली जात आहे. मात्र, त्यावर उपाय सापडत नसल्याने आता सौरऊर्जा वापरात आणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंमलात येत आहे. त्याद्वारे राज्यात सौरऊर्जेपासून तयार होणारी वीज घेऊन कृषीपंप दिवसा चालविण्यासाठी ही वीज देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. (Solar project to provide electricity to agricultural pumps during day survey started )
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. चोपडा तालुक्यातही सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या गावठाण जागांवर सर्वेक्षण सुरू झाले आहे. तेहतीस केव्ही सबस्टेशनच्या जवळच्या अंतरावर हे सोलर प्रोजेक्ट बनविण्यात येणार आहेत. त्यातून येणारी वीज कृषिपंपांसाठी दिवसा देण्याचे प्रयोजन आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यातील सात गावांमध्ये गावठाण जागेवर असे सोलर प्रकल्प उभे करण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
चोपडा तालुक्यात गणपूर, कुसुंबेसह अन्य पाच गावांत हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. राज्यात एकूण २९ दशलक्ष वीजग्राहक आहेत. त्यापैकी ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी वीजनिर्मिती वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २अंतर्गत कामांना सुरुवात झाली आहे. (latest marathi news)
जून २०१७मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. तिच्यात काही बदल करण्यात आले आहेत. या योजनेद्वारे दोन मेगावॅटट ते दहा मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौरप्रकल्प कृषी प्रधान उपकेंद्रांपासून पाच किलोमीटरच्या त्रिज्येत स्थापित केले जाणार आहेत. शेती पंप फीडर सोलरायझेशनचे फायदे पाहता महाराष्ट्र शासनाने ही योजना पुढे नेण्याचे ठरविले आहे.
या योजनेत शीघ्र गतीने सात हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर प्रकल्प राबवून २०२५ पर्यंत सुमारे ३० टक्के फिडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल. ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेच्या कृषी भार असलेल्या उपकेंद्रांपासून पाच ते दहा किलोमीटर परिघात हे विकेंद्रीत सौरप्रकल्प स्थापित केले जाणार आहेत.
पूर्वापार जमिनीवरील अतिक्रमण काढणार!
हे केंद्र उभारण्यासाठी सर्वेक्षणांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यातील सात गावांमध्ये मेगा इंजीनियरिंग इन्फ्रा लिमिटेड ही कंपनी सोलर प्रोजेक्टचे सर्वेक्षण करीत आहे. ही वीज महावितरणला पुरविण्यात येणार आहे. तालुक्यातील सात गावांमध्ये हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यात गणपुर कुसुंबे आदी गावांचा समावेश असल्याचे सर्वेक्षक धीरज पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. काही ठिकाणी पूर्वापार असलेल्या गावांच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत निघण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.