भडगाव : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजाराचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. एकट्या जिल्ह्याचा विचार केला तर ज्वारीचा पेरा, मिळणारा भावात आणि बाजारात सद्यःस्थितीत मिळणाऱ्या भावाचा एकत्रित विचार करता. (Jalgaon sorghum farmers in district being hit by Rs. 1000 per quintal)
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ३१५ कोटीचा फटका बसणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान्य खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची लुट सरू आहे. ज्वारीला ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटल मागे सरासरी १००० रुपयाचे नुकसान होत आहे. मक्याबरोबर ज्वारीची ही नोंदणी केली असती तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता.
३१५ कोटीचा फटका
जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा ४८ हजार ४०३ हेक्टरवर झाला आहे. उत्पादन आणि बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावातील तफावत पाहिली तर तब्बल ३१५ कोटीचा फटका एकट्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना रब्बीत कष्टाने पिकविलेल्या पिकांना हमीभावापेक्षा तब्बल १ हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणि हमीभाव यातील तफावतीची रक्कम ही फरक म्हणून द्यावी अशी मागणी आहे. (latest marathi news)
ज्वारीची खरेदी केंद्राची मागणी
बाजारात धान्याची आवक पाहता तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करण्याची गरज आहे. हंगाम संपल्यानंतर हमीभाव केंद्र कोणासाठी सुरू करणार ? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी धान्य विक्री केले आहे.
त्यामुळे उरलेल्या शेतकऱ्यांच्या माल हमीभावात खरेदीची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान याबाबत मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्वारी खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यावर लगेच नोंदणी करण्यात येईल.
शेतकरी त्रस्त, नेते व्यस्त
शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे नेते मात्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत व्यस्त आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या ज्वारीची माती झाली असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या नेत्यांना मात्र निवडणुकीचे पडले आहे. शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा हजार रुपये कमी दर मिळत असूनही त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसल्याचे वास्तवता आहे.
लोकप्रतिनिधींकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी शासनावर दबाव आणणे गरजेचे आहे. मंत्री गिरीश महाजना यांनी हमीभावात धान्य खरेदीची मागणी केली आहे. ते सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांनी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे.
"मक्याबरोबर ज्वारीची ही हमीभावात खरेदी करण्याची मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे." - गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव
"ज्वारीला बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावात एक हजाराच्या वर तफावत आहे.त्यामुळे शासनाने तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करावेत. ज्या शेतकऱ्यांनी माल विकला आहे त्यांना तफावतीची रक्कम फरक म्हणून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा." -विनोद बोरसे शेतकरी पिचर्डे (ता.भडगाव)
आकडे बोलतात
- जिल्ह्यात ज्वारीचा पेरा------४८४०३ हेक्टर
ः- ज्वारीला हमीभाव-----------३१८० प्रति क्विंटल
- ज्वारीचे अपेक्षित उत्पन्न---३२ लाख क्विंटल
- ज्वारीला मिळत असलेला भाव---२०००-२१०० प्रति क्विंट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.