National Lok Adalat : विशेष लोक अदालत सप्ताह 29 पासून

Jalgaon News : सर्वोच्च न्यायालयातर्फे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताह २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
National Lok Adalat
National Lok Adalatesakal
Updated on

Jalgaon News : लोकअदालतीचे यश लक्षात घेता आणि लोकअदालतीद्वारे पक्षकारांना मिळणारा दिलासा लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयातर्फे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताह २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडींद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ होतो. (Special Lok Adalat week from 29)

लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून निकाली काढण्याकरिता लोकअदालत प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे.

विशेष लोकअदालतीमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत. सर्वोच्य न्यायालयाने लोकअदालतीत ठेवलेल्या प्रकरणांची यादी. (latest marathi news)

National Lok Adalat
Jalgaon News: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 170 पाल्यांना शैक्षणिक बळ! भरारी फाउंडेशन, वेगा केमिकल्सतर्फे दत्तक सोहळा

https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्यांची प्रकरणे यादीमध्ये असतील, त्यांनी स्वतः अथवा वकिलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

विशेष लोकअदालतचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव (मुंबई) यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ८५९१९०३६१९ यावर संपर्क साधावा.

National Lok Adalat
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.