Amalner Assembly Constituency : ‘मविआ’च्या नेत्यांच्या गावात करण पवार ‘मायनस’; मतदारसंघातील फक्त 5 गावांमध्ये मिळाला लीड

Assembly Constituency : स्मिता वाघ यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी करण पवार यांच्यासाठी एक मोट बांधली होती.
smita wagh and karan pawar
smita wagh and karan pawar esakal

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

Amalner Assembly Constituency : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक उमेदवार असलेल्या स्मिता वाघ यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी करण पवार यांच्यासाठी एक मोट बांधली होती. नेत्यांनी एकत्र येत मतदारसंघदेखील पिंजून काढला. मात्र, या नेत्यांना तालुक्यातून मताधिक्य देता आले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक मात्तबर नेत्यांच्या गावांत करण पवार ‘मायनस’ राहिले हे विशेष. (Karan Pawar remained minus in villages of many leaders of Mahavikas Aghadi )

अमळनेर तालुक्यातून भाजपच्या स्मिता वाघ यांना जिल्ह्यातून सर्वाधिक ७१ हजार ७० एवढे मताधिक्य मिळाले. त्या स्थानिक उमेदवार असल्याने त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती, महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांचा एकत्र प्रचार, ग्रामीण भागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे जास्तीत जास्त गावांतून त्यांना लीड मिळू शकला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे करण पवार यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर तालुक्यातील सारबेटे बुद्रूक (५००), सोनखेडी (४३) या दोन गावांत, तर पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द (११६), मोहाडी (१४), शेवगे बुद्रुक (८५) या तीन अशा एकूण पाच गावांमध्ये लीड (कंसात दिलेली मते) मिळू शकला आहे, तर शहरातील ८१पैकी १५ मतदान केंद्रांवर करण पवार यांना मताधिक्य मिळाले. (latest marathi news)

smita wagh and karan pawar
Nashik East Assembly Constituency : महायुतीची आघाडी कायम, भविष्यात मात्र आव्हान

त्यातील बहुतांश मतदान केंद्र ही मुस्लिमबहुल भागातील आहेत. मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गावात स्मिता वाघांना मिळालेले मताधिक्य कंसात दिलेले आहे. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील-मालपूर (१७३), शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या ॲड. ललिता पाटील-बाम्हणे (११५), राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील-शिरूड (६९४), राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील अंतुर्ली-रंजाणे (३१४),

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील-मंगरूळ (१,१४७), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी-खवशी (९६), किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मार्केटचे उपसभापती सुरेश पाटील-निंभोरा (१२१), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे यांच्या पिळोदे गावात ५१७ एवढे मताधिक्य स्मिता वाघांना मिळाले आहे, तर ज्यांची शेवटपर्यंत तटस्थ भूमिका होती, असे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या गावातदेखील स्मिता वाघांना १०० मतांचे मताधिक्य मिळाले.

विधानसभेला वेगळा कौल!

लोकसभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गावात जरी भाजपला लीड असला तरी विधानसभेला हे चित्र असेलच असे नाही. मागील तीन लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातून भाजपला ५० हजारांच्यावर मताधिक्य मिळाले आहे. मात्र, विधानसभेच्या मागील तीन निवडणुकीत भाजपच्याच अधिकृत उमेदवाराला पराभव मान्य करावा लागला आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल.

smita wagh and karan pawar
Jalgaon Assembly Constituency : ‘प्रीलीम’ तर पास, आमदारांची ‘मेन्स’ अद्याप बाकी; विधानसभेला लागणार कसोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com