Jalgaon Tax Recovery : पारोळा पालिकेच्या मालमत्ता करवसुलीला वेग

Jalgaon News : ‘मार्चएंड’मुळे पालिकेच्या करवसुलीला वेग आला असून, येथील पालिकेची आजवर ४० टक्के करवसुली झाल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.
Team leader Subhash Thorat, Yamini Jate, Kishore Chaudhary and municipal employees while giving tax receipts to businessmen.
Team leader Subhash Thorat, Yamini Jate, Kishore Chaudhary and municipal employees while giving tax receipts to businessmen.esakal
Updated on

पारोळा : ‘मार्चएंड’मुळे पालिकेच्या करवसुलीला वेग आला असून, येथील पालिकेची आजवर ४० टक्के करवसुली झाल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. येथील नगरपालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली असून, थकीत करदात्यांवर दंडात्मक कारवाई तसेच नळ कनेक्शन बंद करणे, दुकान, गाळे मालमत्ता सील करणे अशा स्वरुपाची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाई थांबविण्यासाठी व कटू प्रसंग टाळण्यासाठी करदात्यांनी भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Jalgaon Speed ​​up property tax recovery of Parola Municipality)

दरम्यान, पालिकेकडून करवसुलीसाठी पाच पथक तैनात करण्यात आले आहेत. एक पथक पालिकेत वसुली कामी ठेवण्यात आले आहे. तसेच वसुली न देणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाई करण्याचे तसेच थकबाकीदार शासकीय कार्यालयावर धडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी पथकाला दिल्याने मोठ्या प्रमाणावर मिळकतधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.

तसेच शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी ही जुन्या आकारणीप्रमाणे घेण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षात मिळकतधारकांनी थकबाकी न ठेवता आपल्याकडील कर भरणा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांत सुमारे २५ ते ३० लाख रुपये करवसुली करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

या वेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकात कार्यालय अधीक्षक संघमित्रा संदानशिव, लेखापाल राहुल साळवे, लेखापरीक्षक दीपक महाजन, बांधकाम अभियंता सुमित पाटील, निवडणूक विभागप्रमुख सुभाष थोरात, आस्थापना प्रमुख यामिनी जटे. (latest marathi news)

Team leader Subhash Thorat, Yamini Jate, Kishore Chaudhary and municipal employees while giving tax receipts to businessmen.
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या चाहुलीने पुढारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात!

पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगररचना अभियंता साक्षी मराठे, तांत्रिक कक्ष अधिकारी भूषण महाजन, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, किशोर चौधरी, रमेश तिळकर, किरण कंडारे, सचिन चौधरी, विश्वास पाटील, प्रभारी आरोग्य निरीक्षक भिका नरवाळे यांच्यासह पालिका कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

"शहरातील मिळकतधारकांनी शनिवार, रविवार सुटीचे दिवस असले तरी दोन्ही दिवशी शहरातील पथकाकडून व पालिकेत करवसुली घेतली जाणार आहे. तरी शहरवासीयांनी व गाळे व्यावसायिक व शासकीय कार्यालय यांनी आपल्याकडील करवसुली पालिकेत जमा करावी."- किशोर चव्हाण, प्रशासक तथा मुख्याधिकारी

Team leader Subhash Thorat, Yamini Jate, Kishore Chaudhary and municipal employees while giving tax receipts to businessmen.
Jalgaon News : अजित पवार गटाचा आज जिल्हा मेळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.