Jalgaon News: अमळनेर हद्दीतील 15 गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास; पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव

Jalgaon News : एमपीडीए प्रस्ताव अचूक व कायदेशीर तयार केला म्हणून अनेक गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली म्हणून पोलिस कर्मचारी किशोर पाटील, तसेच क्राईम दप्तर अद्ययावत ठेवल्यामुळे संदीप धनगर, राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला.
Superintendent of Police Dr. Police Naik Siddhant Shisode receiving the honor from Maheshwar Reddy.
Superintendent of Police Dr. Police Naik Siddhant Shisode receiving the honor from Maheshwar Reddy.esakal
Updated on

अमळनेर : गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रोख रक्कम देऊन सन्मान केला. अमळनेर पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी पोलिस अधीक्षक अमळनेर येथे आले होते. (Speedy investigation of 15 serious crimes in Amalner area)

महिला अत्याचार अंतर्गत व विविध गंभीर १५ गुन्ह्यांचा गतीने तपास केला. तसेच आरोपींना तत्काळ अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले म्हणून पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलिस कर्मचारी विनोद सोनवणे, नितीन मनोरे यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.

त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारी गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे यांनी गोपनीय अहवाल अद्ययावत ठेवला, दप्तर सुरळीत ठेवल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मान केला. एमपीडीए प्रस्ताव अचूक व कायदेशीर तयार केला म्हणून अनेक गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली म्हणून पोलिस कर्मचारी किशोर पाटील, तसेच क्राईम दप्तर अद्ययावत ठेवल्यामुळे संदीप धनगर, राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला. (latest marathi news)

Superintendent of Police Dr. Police Naik Siddhant Shisode receiving the honor from Maheshwar Reddy.
Vinesh Phogat disqualified: विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर कोणतं पदक मिळणार? नेमकं काय होणार?

निरीक्षण व तपासणी दरम्यान उत्कृष्ट परेड केली तसेच इतर कामगिरी केली म्हणून पोलिस कर्मचारी हर्षल पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर साळुंखे, अमोल पाटील, पोलिस कर्मचारी मोनिका पाटील, योगेश सोनवणे यांचाही रोख बक्षीस देऊन सन्मान केला. या वेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गुन्ह्यांची निर्गती लवकर करा, सामान्य जनतेला न्याय द्या, खरे खोटे याची पडताळणी करा, अशा सूचना दिल्या. पोलिस पाटलांचीही स्वतंत्र बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणूका कायदा व सुव्यवस्था पारदर्शी व सुरळीत, शांततेत पार पाडा, असे आवाहन केले. पोलिस ठाणे व आवाराची पाहणी केली.

Superintendent of Police Dr. Police Naik Siddhant Shisode receiving the honor from Maheshwar Reddy.
Uddhav Thackeray: चंद्रहार पडला पण आनंद झाला...विशाल-विश्वजीत यांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरे सांगली पॅटर्नवर काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.